आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणेफेकीचा काैल अडचणीत टाकणारा:भारतीय संघाचा नाणेफेकी जिंकण्याचा काैल कसा राहिला ?

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार राेहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यामागे गत रेकाॅर्डची भूमिकाही महत्त्वाची मानली जात हाेती. कारण दाेन्ही संघांतील गत १० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा टीमला फक्त दाेन वेळा विजयाची चव चाखता आली. उर्वरित ८ सामन्यांमध्ये लक्ष्यचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला. त्यामुळे हेच अचूक समीकरण लक्षात घेऊन कर्णधार राेहित शर्माने पाकला प्रथम फलंदाजीची संधी दिली. २०१२ मध्ये पाकिस्तान संघाचा तत्कालीन कर्णधार हाफिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला हाेता. मात्र, हाच निर्णय त्याच्या अंगलट आला. कारण या सामन्यात भारताने आठ गड्यांनी पाकला धूळ चारली हाेती. त्यानंतरही पाकला याच नाणेफेकीचा काैल अडचणीत टाकणारा ठरला.

बातम्या आणखी आहेत...