आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Hyderabad Mukti Sangram Sports Festival From Tomorrow, Nearly 5 Thousand Athletes Will Participate

क्रीडा महोत्सव:हैदराबाद मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सव उद्यापासून, जवळपास 5 हजार खेळाडू सहभागी होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि अॅडव्होकेट्स स्पोर्टस अँड कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सवाचे १० ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सभु महाविद्यालय, एमपीपी स्पोर्ट््स पार्क व मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर (एमएसएम) खेळवल्या जातील. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेत पुन्हा एकदा जवळपास ५ हजार खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती अॅडव्होकेटस् स्पोर्टस अॅण्ड कल्चरल असोसिएशन अध्यक्ष अॅड. गोपाळ पांडे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

अॅड. पांडे म्हणाले की, अनेक शाळांनी यंदा स्पर्धा होणार की नाही, या बाबत सतत विचारणार केली. स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही स्पर्धा आयाेजनाचा निर्णय घेतला. यातून या क्रीडा महोत्सवात एकूण ९ विविध खेळाच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये लंगडी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल या सांघिक खेळांसह अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, जलतरण आणि मल्लखांब या वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा पार पडतील. विविध स्पर्धेसाठी विविध वयोगट ठेवण्यात आले आहे. यामुळे युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना मिळणार आहे. त्यांना या महाेत्सवाच्या माध्यमातून आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची आणि लक्षवेधी कामगिरी करण्याची माेठी संधी आहे. त्यामुळे हा महाेत्सव युवांच्या कामगिरीला चालना देणारा ठरणार आहे, असेही ते म्हणाले. विजेत्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी बक्षीस देऊन गाैरवण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सभुच्या मैदानावर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे यांच्या हस्ते होईल. या स्पर्धेचे प्रायोजकत्व सुनील सुतवणे, माजिद पाटणी, मनिष धूत, लकबीरसिंग छाबडा, कमलसिंग सूर्यवंशी, रमेश मुथा, राजीव मुगदिया, शिरीष गादिया, कलीम खान, रवींद्र जैन, रेणूकादास वैद्य, बालकृष्ण भाकरे, भेलांडे आदींनी यांनी स्विकारले आहे.

शहरातील विविध तीन मैदानांवर होणार स्पर्धा अॅड. संकर्षण जोशी म्हणाले की, खो-खो, व्हॉलीबॉल, अॅथेलेटिक्स या खेळांच्या स्पर्धा सभु महाविद्यालयाच्या मैदानावर, जलतरण, फुटबॉल, जिम्नॅस्टिक व मल्लखांब या स्पर्धा एमपीपी स्पोर्ट््स पार्क, ताज हॉटेलसमोर, हिमायतबाग येथे आणि बास्केटबॉल, लंगडी खेळाच्या स्पर्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहेत. संघटनेच्या प्रतिनिधींना स्पर्धेशी जोडले आहे. या पत्रकार परिषदेला अॅड. संकर्षण जोशी, डॉ. विशाल देशपांडे, डॉ. दयानंद कांबळे आणि सतीश पाठक आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...