आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 'I Am A Bowler, I Came To Take Wickets' Mumbai Indians Bowler Saika Is Rocking This Year's League

‘मी आहे बाॅलर, विकेट घेण्यासाठी आले’:मुंबई इंडियन्सची गाेलंदाज साइका गाजवत आहे यंदाची लीग

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी गुणवंत गाेलंदाज आहे. विकेट घेण्यासाठी आले आहे,’ हे खणखणीत स्वरातील वाक्य आहे मुंबई इंडियन्स संघातील युवा गाेलंदाज साइका इशिकाचे. तिची पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमधील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. विजयी हॅट‌्ट्रिक साजरी करणाऱ्या मुंबई संघाकडून आतापर्यंत साइकाने सलग तीन सामन्यांत बळी घेतले. यातून तिच्या नावे ९ बळींची नाेंद आहे. यासह तिच्या नावे लीगमध्ये सर्वाधिक बळी नाेंद झाले आहेत. यातून तिने आपला पर्पल कॅप मिळवण्याचा दावा अधिक मजबूत केला. तिची सलामी सामन्यात गुजरात जायंट्स संघाविरुद्धची कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने पदार्पणात चार बळी घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिने गुरुवारी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाला अवघ्या १८ षटकांत १०५ धावांवर राेखण्याचा पराक्रम गाजवला. तिने ३ बळी घेतले. त्यामुळे तिला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.

वयाच्या १२ व्या वर्षी हरवले पितृछत्र : काेलकात्याच्या दक्षिण परिसरातील सर्कस पार्कमध्ये साइका इशिका ही आपल्या कुटुंबीयांसमवेत राहते. आता तिच्यासाेबत आई आणि भाऊ असताे. वयाच्या १२ व्या वर्षी तिच्या डाेक्यावरील पितृछत्र हरवले. मात्र, आईच्या पाठबळातून तिने आपले क्रिकेटपटू हाेण्याचे स्वप्न साकारले. यातून तिला १९ आणि २३ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत बंगाल संघाने पदार्पणाची संधी दिली. यादरम्यान लक्षवेधी गाेलंदाजी करत तिने सर्वांची मने जिंकली. हरमन, तानियाची विकेट : बंगाल संघाची आघाडीची गाेलंदाज म्हणून साइकाची भूमिका लक्षवेधी ठरली. तिने महिलांच्या सीनियर नॅशनल क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळणाऱ्या हरमनप्रीत आणि तानिया भाटियाला सलग दाेन चेंडूंवर बाद केले. यामुळे तिच्यावर काैतुकाचा वर्षाव झाला. याच कामगिरीतून तिला आता लीगसाठी संधी मिळाली. २०१८ दरम्यान तिला गंभीर दुखापत झाली हाेती. त्यामुळे तिला दाेन वर्षे ब्रेक घ्यावा लागला. मात्र, तिने आता २०२१ मध्ये दमदार पुनरागमन केले.

बातम्या आणखी आहेत...