आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅडमिंटन:मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, खेळण्यास सज्ज : पीव्ही सिंधू

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने म्हटले की, कोरोनादरम्यान आत ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि खेळण्यासाठी सज्ज झाले. ती म्हणाली, “नियमित नियोजनाला अचानक रोखणे सोपे नसते. मात्र, असे करणे स्वत:साठी महत्त्वाचे होते. मी घरात काम करत स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मला मदत झाली. मी माझ्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवला. मी कोर्टवर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा थोडे कठीण वाटले. आता मला वाटते की, मी कोर्टवर जाण्यासाठी तंदुरुस्त असून स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहे.’

सिंधूने सप्टेंबरमध्ये डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. ती थॉमस व उबर कपमध्ये खेळण्यासाठी तयार होती, मात्र स्पर्धा स्थगित झाली. “मी एशियात स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे. मी दीर्घकाळानंतर कोर्ट पुनरागमन करेल. सराव चांगला सुरू अाहे. विश्रांतीने मला एक खेळाडू म्हणून खूप शिकवले आणि सुधारणा करण्यास मदत केली. मी या विश्रांती काळात खूप सकारात्मक गोष्टी शिकण्यात यशस्वी ठरले, असेही तिनाे सांगितले.