आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • I Haven't Picked Up A Spear In 50 Days, But Ready For An Accurate Throw: Neeraj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी मुलाखत:मी ५० दिवस झाले भाला हाती घेतला नाही, मात्र अचूक थ्रोसाठी तयार : नीरज

चंदिगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाेकियाे ऑलिम्पिकमध्ये पदकाचा सकारात्मक विचार करतोय नीरज

(गौरव मारवाह)

भारतीय अॅथलेटिक्सचा गोल्डन बॉय नीर चोपडाने ५० पेक्षा अधिक दिवस झाले, हातात भाला घेतला नाही. तो मैदानात पुनरागमन करत भालाफेकीसाठी आतुर झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचा दावेदार असलेला २२ वर्षीय नीरज आपल्या अचूक थ्रोसाठी तयार आहे. तो सध्या एनआयएस पतियाळामध्ये असून तंदुरुस्तीसाठी मेहनत घेतोय. यापूर्वी तो तुर्कीत प्रशिक्षण घेत होता. मात्र, १८ मार्चला त्याला भारतात परतावे लागले. तेव्हापासून तो मैदानात उतरला नाही.

दबाव घेत नाही नीरज, प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न :

जागतिक कनिष्ठ गट विक्रमवीर नीरज म्हणतो, “मी कोणत्याही प्रकारचा दबाव घेत नाही. लोक माझ्याकडून अपेक्षा करतात, तर गर्व वाटतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. मी विक्रम व पदकाच्या बाबतीत अधिक विचार करत नाही. प्रत्येक स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी करण्यावर मी लक्ष देतो. एका दिवसात आपले सर्व कौशल्य दाखवावे लागते. माझ्यासमोर प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात, जसे माझा विरोधी कशी कामगिरी करतो. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. माझे लक्ष केवळ आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टीवर ठेवतो.’

कंडिशनिंग, फिटनेसवर काम सुरू :

एशियन व कॉमनवेल्थ चॅम्पियन नीरजने म्हटले, “लॉकडाऊनने सरावास अडचणी आणल्या आहेत, कारण आम्हाला ट्रॅकवर जाण्यास परवानगी नाही. मी सध्या आपल्या कंडिशनिंग व फिटनेसवर काम करत आहे. मी नियमित सराव ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दिवसातून २ वेळा सराव करतो. मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही मोठी विश्रांती आहे. मात्र, आपण नकारात्मक विचार आपल्या जवळ येऊ न देणेही चांगले. अनेक वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. एक खेळाडू म्हणून मी आपल्या सरावावर आणि सकारात्मक विचारावर लक्ष्य केंद्रित करतोय.’

>नीरजने दुखापतीतुन बाहेर पडल्यावर जानेवारीमध्ये द. आफ्रिकेत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला.

>तो म्हणतो - ऑलिम्पिक नियोजित वेळेत झाले असते, तर मी त्यासाठी तयार होतो. आता तांत्रिक बाजू सुधारतोय.

बातम्या आणखी आहेत...