आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलने चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. अनिल कुंबळेंच्या अध्यक्षतेत क्रिकेट कमेटीने लाळेच्या बॅनची मागणी केली होती. याशिवाय आयसीसीने दोन देशांत होणाऱ्या सीरीजमध्ये ज्या देशात सामने होत आहेत, त्या देशातल्या अंपायरच्या नियुक्तीला परवानगी दिली आहे.
अद्याप आयसीसीच्या नियमांनुसार, दोन देशांच्या सामन्यात तिसऱ्या देशातील अंपायरला नियुक्त केले जात होते. परंतू, आता कोरोना व्हायरसमुळे हा नियम बदलण्यात आला आहे. याशिवाय मॅच रेफरीदेखील त्या देशाचा असेल. तसेच, टेस्ट मॅचमध्ये कोरोना कन्क्शनचा नियम लागू होईल. म्हणजे, एखादा खेळाडून संक्रमित आढळल्यास, त्याला रिप्लेस केले जाईल. पण, हे फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये होईल.
टेस्टमध्ये कोरोना सब्स्टीट्यूट नियम लागू
कोरोना कन्कशनबाबत इंग्लँड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने एक प्रस्ताव आयसीसीला पाठवला होता. प्रस्तावात टेस्ट मँचदरम्यान, एखाद्या खेळाडूनला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याबाबत सांगण्यात आले होते.
खेळाडूच्या रिप्लेसमेंटचा आधार एकच असेल. जर एखादा फलंदाज कोरोना संक्रमित आढळला, तर त्याजागी फलंदाजच संघात येईल. गोलंदाजाच्या जागी दुसरा गोलंदाजच घेईल. खेळाडूच्या रिप्लेसमेंटबाबत मॅच रेफरी निर्णय घेईल.
चेंडूवर लाळ लावल्यास दंड
आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे. जर एखाद्या खेळाडूने असे केले, तर अंपायर संघाला दोनदा वॉर्निंग देईल. यानंतरही असेल झाल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 रन जोडले जातील. चेंडूला लाळ लावल्यानंतर अंपायर चेंडूला पूर्णपणे डिसइनफेक्ट करेल आणि त्यानंतर खेळ सुरू होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.