आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • ICC Player Of The Month Award; Pakistan's Nida Dar Wins In Women's Category

भारताचा काेहली पहिल्यांदा ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा मानकरी:आयसीसीचे प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार; पाकची निदा दार महिला गटात विजेती

दुबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टाेबर महिन्यात झंझावाती खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा माजी कर्णधार विराट काेहली आयसीसीच्या प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला ऑक्टाेबर महिन्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महिला गटामध्ये पाकिस्तान संघाच्या निदा दारला हा पुरस्कार मिळाला आहे. टीम इंडियाच्या काेहलीने या महिन्यात तुफानी खेळी करताना २०५ धावा काढल्या. यासह ताे पहिल्यांदाच या पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सिडनीमध्ये हाॅलंडविरुद्ध सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले हाेते. त्यापाठाेपाठ काेहलीने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा काढल्या हाेत्या.

पाकच्या निदा दारने ऑक्टाेबर महिन्यात ७२.५० च्या सरासरीने १४५ धावा काढल्या. याशिवाय तिने ८ बळी घेतले. त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला. तिने या पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या भारताच्या जेमिमा आणि दीप्तीला मागे टाकले.

बातम्या आणखी आहेत...