आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:गव्हर्नमेंट ऑफिसर्स संघाने पटकावला आयकॉन चषक

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय गाडेकरची स्फोटक फलंदाजी आणि रामेश्वर रोडगे यांची कर्णधाराला साजेशी अष्टपैलू खेळी या बळावर गव्हर्नमेंट ऑफिसर्स संघाने एमजीएम मैदानावर सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य क्रेडाई संघावर ४६ धावांनी दणकेबाज विजय मिळवत आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. गव्हर्नमेंट ऑफिसर्स संघाने १५ षटकांत ७ बाद १४३ अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात क्रेडाई संघाला १५ षटकांत ९ बाद ९७ धावापर्यंतच मजल मारता आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, सहआयुक्त श्रीकांत, अजित रॉय तोगरे, चंद्रकांत केदार, चेतन गिरासे, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, एमसीएचे चेअरमन सचिन मुळे, क्रेडाई प्रेसिडेंट विकास चौधरी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...