आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • If It Wasn't For Venus, I Wouldn't Be Either: Serena Williams | Marathi News

यूएस ओपनच्या तिसऱ्या सामन्यात सेरेना हारली:व्हीनस नसती तर मीही नसते : सेरेना विलियम्स

मॅथ्यू फटरमॅनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या यशामागे कोणाचा ना कोणाचा हात असतो. यात आईवडील, भाऊ, बहीण, पत्नी किंवा मित्र यापैकी कोणीही असू शकते. अमेरिकी टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सलाही स्टार बनण्यात तिची बहीण व्हीनस विलियम्सचे मोठे योगदान आहे. ४० वर्षीय टेनिस खेळाडू सेरेनाने फेअरवेल सामन्यात ही बाब दर्शकांसमोरच कबूल केली होती. ती म्हणाली की, ‘हा प्रदीर्घ काळ राहिला. आयुष्यभर टेनिस खेळले. हे आनंदाश्रू आहेत. कुटुंबीयांचे आभार. खास करून व्हीनसचे आभार. कारण ती नसती तर सेरेनाही राहिली नसती.’ २३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनाला वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत सेरेनाला ऑस्ट्रेलियाच्या २९ वर्षीय आयला टोमलानोविच हिने तीन सेटमध्ये ७-५, ६-७, ६-१ ने हरवले.

मेदवेदेव प्री-क्वार्टरमध्ये, जेबूर आणि गॉफही जिंकल्या
डिफेंडिंग चॅम्पियन मेदवेदेव प्री-क्वार्टरमध्ये पोहोचला आहे. अव्वल नामांकित मेदवेदेवने चीनच्या यिबिंग वूला सलग सेटमध्ये ६-४, ६-२, ६-२ ने हरवले. आता प्री-क्वार्टरमध्ये त्याचा सामना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसशी होईल. त्याने अमेरिकेच्या जेजे वोल्फला तीन सेटमध्ये ६-४, ६-२, ६-३ ने हरवले. तर महिला एकेरीत वर्ल्ड नं. ५ ओंस जेबूर आणि अमेरिकेची कोको गॉफने पहिल्यांदाच चौथ्या फेरीत स्थान मिळवले.

बातम्या आणखी आहेत...