आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • Iga Swiatek Vs Ons Jabeur, US Open Women's Singles Final US Open Champion Iga Swiatek Swiatek Defeated Tunisian Ons Jabeur Swiatek First Polish Player To Win A US Open Title, New US Open Champion: Iga Swatek Wins First US Open Title, Third Grand Slam Of Her Career

US ओपनची नवीन चॅम्पियन:इगा स्वातेकने पहिल्यांदाच जिंकले US ओपनचे विजेतेपद, तिच्या कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

यावेळी US ओपनला नवीन चॅम्पियन मिळाली आहे. शनिवारी रात्री आर्थर ऐश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्वातेकने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा 6-2,7-6 असा पराभव केला.

यासह ती पहिल्यांदाच US ओपनची चॅम्पियन बनली आहे. तिच्या कारकिर्दीतील हे तिसरे ग्रँडस्लॅम असून तिने याआधी दोनदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

इगाने या सामन्यात सुरुवातीपासूनच एखाद्या चॅम्पियनप्रमाणे खेळ केला आणि पहिला सेट 6-2 अशा फरकाने सहज जिंकून आघाडी घेतली. ओन्सने तिला दुसऱ्या सेटमध्ये आव्हान दिले, परंतु स्वातेकने हार मानली नाही आणि तिने 7-6 असा सेट जिंकून सामन्यात पुनरागमन केले आणि पहिल्यांदाच US ओपन जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले.

US ओपनच्या अंतिम फेरीत इगाने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा 6-2, 7-6 असा पराभव केला.
US ओपनच्या अंतिम फेरीत इगाने ट्युनिशियाच्या ओन्स जेबूरचा 6-2, 7-6 असा पराभव केला.

एका हंगामात दोन ग्रँड जिंकणारी इगा आहे दुसरी खेळाडू

इगा स्वातेकने यावर्षी 38 सामने आणि सात स्पर्धा जिंकल्या आहेत. एकाच हंगामात दोन ग्रँडस्लॅम ट्रॉफी जिंकणारी स्वातेक ही एजेलंकी कर्बरनंतर दुसरी खेळाडू आहे. US ओपनपूर्वी तिने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते.

स्वातेकने ओन्सला टाकले मागे

इगा स्वातेक आणि ओन्स अंतिम फेरीपूर्वी चार वेळा आमनेसामने आले होते. प्रत्येकी दोन सामने जिंकून दोन्ही खेळाडू बरोबरीच्या मार्गावर होते. त्याचबरोबर US ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवत स्वातेकने ओन्सला मागे टाकले आहे. या विजयासह दोघांमधील पाचपैकी तीन सामने स्वातेकच्या खात्यात जमा झाले आहेत. ओन्सच्या खात्यात फक्त 2 विजय आहेत.

US ओपनमध्ये इगाचा प्रवास

 • तिने पहिल्या फेरीत जास्मिन पाओलिनीचा 6-3, 6-0 असा पराभव केला.
 • तिने दुसऱ्या फेरीत स्लोएन स्टीफन्सचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
 • तिने तिसऱ्या फेरीत लॉरेन डेव्हिसचा 6-3, 6-4 असा पराभव केला.
 • तिने चौथ्या फेरीत ज्युली निमेयरचा 2-6, 6-4, 6-0 असा पराभव केला.
 • तिने अंतिम-8 मध्ये जेसिका पेगुलाचा 6-3, 7-6 असा पराभव केला.
 • उपांत्य फेरीत तिने आर्यना सबालेंकाचा 3-6, 6-1, 6-4 असा पराभव केला.
 • अंतिम फेरीत तिने ओन्स जेबूरचा 6-2, 7-6 असा पराभव केला.
बातम्या आणखी आहेत...