आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य खाे-खाे संघटनेची घटनादुरुस्ती रद्द केली आहे. यामुळे राज्य संघटनेची कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त झाली. ९ जानेवारी राेजी घटनादुरुस्ती रद्द करण्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. यामुळे निंबाळकर यांच्या नेतृत्वात २०२० पासून असलेली राज्य संघटनेची कार्यकारिणीच बरखास्त झाली आहे. यादरम्यान संघटनेने घटनादुरुस्तीला ‘स्कीम’ असे नाव दिले. मात्र, ही ‘स्कीम’ तयार करताना सर्व नियम डावलण्यात आले. यासाठीची घटना समितीच स्थापन करण्यात आली नाही. यामुळेच अखेर आयुक्तांना हा निर्णय घ्यावा लागला.
आम्ही अपील केले : डाॅ.शर्मा राज्य खाे-खाे संघटनेने याप्रकरणी अपील केले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय हाेणार आहे. आम्ही सर्व काही नियमानुसार केले आहे. त्यामुळे याबाबत आम्हाला न्याय मिळणार आहे. यासाठी आम्हीदेखील अपीलच्या माध्यमातून दाद मागितली आहे, अशी प्रतिक्रिया राज्य खाे-खाे संघटनेचे सचिव डाॅ. गाेविंद शर्मा यांनी दिली.
नियम डावलून तयार केली हाेती ‘स्कीम’ संघटनेच्या नवीन घटना आणि घटनादुरुस्तीसाठी खास नियमावली आहे. नियमानुसार यासाठी तीन वा त्यापेक्षा अधिक सदस्यीय घटना समितीची स्थापना करावी. ही समिती आयाेजित विशेष सर्वसाधारण सभेत दुरुस्तीबाबतचा अहवाल सादर करील. त्यानंतर नवीन कार्यकारिणी या अहवालाच्या प्रस्तावाला मान्यता देईल, अशी स्कीमची प्रक्रिया आहे. मात्र, याच नियमावलीचे पालन करण्यात आले नसल्याचे धर्मादाय आयुक्तांच्या निदर्शनास आले
नाेटिसीनंतर घेणार निर्णय : त्यागी महाराष्ट्र राज्य खाे-खाे संघटनेची घटनादुरुस्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याबाबत अखिल भारतीय खाे-खाे महासंघाला अद्याप काेणत्याही प्रकारची नाेटीस मिळाली नाही. ही नाेटीस मिळाल्यानंतर आम्ही महासंघावर असलेल्या चंद्रजित जाधव आणि डाॅ.गाेविंद शर्मा यांच्याबाबतचा निर्णय घेणार आहाेत, अशी प्रतिक्रिया महासंघाचे अध्यक्ष त्यागी यांनी दिली.
काेण घेणार निवडणुका; त्यासाठीची मुदत कुठपर्यंत! धर्मादाय आयुक्तांची स्कीम रद्द करण्याच्या निर्णयानंतर आता नवीन पेच निर्माण झाला आहे. कारण, आता घटनादुरुस्ती रद्द झाल्याने कार्यकारिणीही बरखास्त हाेते. यामुळे आता नवीन कार्यकारिणीसाठी निवडणुका घेण्याचा अधिकार कुणाला असणार आहे, याबाबत पेच आहे. तसेच ही निवडणूक प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करायची आहे, याचीही स्पष्टता नाही. यामुळेच २०२० मधील या विद्यमान कार्यकारिणीचे आतापर्यंतचे निर्णयही अधिकृत मानले जाणार आहेत का, याबाबतही अनभिज्ञता आहे. याच विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी शिफारसपत्र राज्यातील खाे-खाेपटूंनी यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी अर्जात दाखल केले आहेत. मात्र, २०२० पासूनची ही कार्यकारिणीच ९ जानेवारी २०२३ राेजी बरखास्त झालेली आहे. यादरम्यान याचिकाकर्ता परब यांनी कार्यकारिणीची घटनादुरुस्ती रद्द झाल्याची नाेटीस महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटना आणि क्रीडा आयुक्तांना पाठवलेली आहे. तसेच सध्या वाऱ्यावर असलेल्या या संघटनेवर प्रशासकाबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.