आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Improving Quality Through Father's Support; Thoroughly Practice On Synthetic Pitch

यंग प्लेअर ऑफ द वीक - सरफराज खान:वडिलांच्या पाठबळामुळे गुणवत्तेला चालना; सिंथेटिक पिचवर कसून सराव

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

- सरफराज हा रणजी ट्राॅफीच्या यंदाच्या सत्रात टॉ स्काेअरर आहे. त्याच्या नावे ७२.६५ च्या स्ट्राइक रेटने ७०४ धावांची नाेंद आहे. यामध्ये या खेळीत तीन शतकांसह एका अर्धशतकाचा समावेश आहे. - १२ व्या वर्षी सरफराजने हॅरिस शील्ड आंतरशालेय स्पर्धेत सर्वाेच्च स्काेअरचा विक्रम ब्रेक केला होता. त्याने रिझवी स्प्रिंगफील्ड टीमचे प्रतिनिधित्व करताना ५६ चाैकार व १२ षटकारांसह ४३९ धावा काढल्या. - सरफराजने २०१४ मध्ये मुंबई संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, ताे २०१५-१६ मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळू लागला. त्यानंतर ताे पुन्हा मुंबई संघात सहभागी झाला. - मुंबईत जन्मलेल्या सरफराजचे बालपण हे आझाद मैदानावर गेले. वडील नाैशाद खान यांनी त्याच्या गुणवत्तेला चालना दिली. त्याच्यासाठी खास सिंथेटिक पिच तयार केले. याच पिचवर ताे सातत्याने सराव करू लागला. - सरफराजच्या नावे रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेमधील गत १३ डावांत एक त्रिशतक, दाेन द्विशतके, दाेन १५०+ स्काेअर, एक शतक व तीन अर्धशतकांची नाेंद आहे. दरम्यानची त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली.

खेळ -क्रिकेट देश- भारत

मुंबई संघाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशात सरफराजचे मोलाचे याेगदान ठरले. त्याने शतकी खेळी केली. मुंबईला उत्तराखंडवर विक्रमी ७२५ धावांनी विजयाची नाेंद करता आली. सरफराजने १५३ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...