आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In 1984 India Pak Clashed For The First Time In UAE, 8 Thousand Fans Were Present

आशिया कपचा पहिला भारत पाक सामना:1984 ला यूएईमध्ये प्रथमच भिडले भारत-पाक, 8 हजार चाहते उपस्थित

दुबई | शानीर एन सिद्दिकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएईमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात पहिला अधिकृत सामना १३ एप्रिल १९८४ मध्ये शारजामध्ये खेळवला गेला होता. तो पहिला आशिया कपचा देखील सामना होता आणि आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) स्थापना झाली होती. शारजाह स्टेडियमच्या इमारतीत एसीसीचे पहिले कार्यालयही बांधले गेले. शारजाह क्रिकेट स्टेडियमचे महाव्यवस्थापक मजहर खान सांगतात, “मी त्यावेळी व्यवस्थानाचा भाग होतो. तो सामना पाहण्यासाठी सुमारे ८ हजार लोक आले होते आणि ५ हजारांहून अधिक लोक बाहेर उभे होते. या दोन्ही देशांच्या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. असे वाटत हाेते की, स्टेडियमबाहेर यात्रा सुरू आहे.’ यूएईमधील क्रिकेटच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले श्याम भाटिया म्हणाले, “त्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने डावाला सुरुवात केली. ४६ षटकांच्या या सामन्यात यष्टिरक्षक सुरेंदर खन्नाने ५६, संदीप पाटीलने ४३ आणि गावस्करने ३६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने ४ बाद १८८ धावा केल्या. त्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारच्या नमाजमुळे मोठी विश्रांती होती. एक समज होता की, शुक्रवाचा सामना पाकिस्तान जिंकतो. परंतू भारत जिंकला.

बातम्या आणखी आहेत...