आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • In 20 Years, The Participation Of Female Athletes In The Olympics Has Increased By 10 Percent; News And Live Updates

दिव्य मराठी संशोधन:20 वर्षांत ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग 10 टक्क्यांनी वाढला

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • यंदा लैंगिक समानतेसाठी शपथ घेणाऱ्या पुरुष-महिलांची संख्या बरोबरीत

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओए) महिलांचा स्पर्धेतील सहभागावर सतत प्रयत्न करत असते. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक पुरुष व एक महिला ध्वजवाहक असतील. मिश्र प्रकाराची संख्या वाढवून १८ करण्यात आली, जी रिओ ऑलिम्पिकपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे महिलांचा स्पर्धेतील सहभाग वाढला. यंदाच्या दशकात महिलांचा १० टक्के सहभाग वाढला आहे. त्याचबरोबर त्याच्या स्पर्धेच्या संख्येतदेखील वाढ झाली. महिला खेळाडू ३३९ पैकी ३०० प्रकारात सहभागी होतील.

यंदा लैंगिक समानतेसाठी शपथ घेणाऱ्या पुरुष-महिलांची संख्या बरोबरीत
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिकमध्ये लैंगिक असमानता समाप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाच्या उद्घाटन सोहळ्यात समावेश होणाऱ्यांची संख्या ३ वरून ६ केली. आतापर्यंत ३ सदस्य शपथ घेत हाेते. खेळाडू, पंच व प्रशिक्षक. टोकियो २०२० पासून तिन्ही गटात एका पुरुषासोबत एक महिला असेल. २३ जुलै स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यात शपथमध्ये दोन नवे शब्द जोडण्यात आले आहेत - समावेश व समानता.

एकूण खेळाडूंमध्ये जवळपास अर्धे महिला खेळाडू असतील

 • ऑलिम्पिक महिला खेळाडूंचा सहभाग (%)
 • सिडनी 2000 38.2
 • अथेन्स 2004 40.7
 • बीजिंग 2008 42.4
 • लंडन 2012 44.2
 • रिओ 2016 45.0
 • टोकियो 2020 48.8
बातम्या आणखी आहेत...