आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In Just 74 Minutes, No. 1 Swatek Won, With Last Runner up Beretini Withdrawing

लंडन:अवघ्या 74 मिनिटांत नंबर-1 स्वातेक विजयी, गत उपविजेता बेरेटिनीने घेतली माघार

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर-१ महिला टेनिसपटू इगा स्वातेकने सहज दुसरी फेरी गाठली. पोलंडच्या स्वातेकने क्रोएशियाच्या जाना फेटला अवघ्या ७४ मिनिटांत ६-०, ६-३ ने मात दिली. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्वातेक सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या फेरीत पोहोचली. तसेच पाचवी मानांकित मारिया सक्कारी, १२ वी मानांकित जेलेना ओस्तापेंको, १३ वी मानांकित बार्बरा क्राजिकोवानेही दुसरी फेरी गाठली.

ग्रीसच्या सक्कारीने ऑस्ट्रेलियाच्या जोई हिवेसला ६-१, ६-४ ने, झेक गणराज्यच्या क्राजिकोवाने बेल्जियमच्या मेरिना जानेवस्काला ७-६, ६-३, लात्विकाच्या ओस्तापेंकोने फ्रान्सच्या ओसियन डोडिनला ६-४, ६-४ ने हरवले. दुसरीकडे, इंग्लंडच्या एमा राडुकानूने बेल्जियमच्या एलिसन वानला ६-४, ६-४ ने व अँडी मरेने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला ४-६, ६-३, ६-२, ६-४ ने मात दिली. पुरुष एकेरीत अॅलेक्स डि मिनॉर, स्टीव जॉन्सन, डेव्हिड गॉफिन हे दुसऱ्या फेरीत पोहोचले. गत उपविजेता मातेओ बेरेटिनीने कोरोना झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली.