आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In Place Of Angad Worth 2 Crores, Gurnur Has A Chance For 20 Lakhs, The Punjab Kings Team Has Decided

अायपीएल:2 काेटींच्या अंगदच्या जागी 20 लाखांत गुरनुरला संधी, पंजाब किंंग्ज संघाने घेतला निर्णय

माेहाली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाला सलामी सामन्यानंतर माेठा धक्का बसला. टीमचा स्टार खेळाडू राज अंगद बावा जायबंदी झाला अाहे. त्यामुळे त्याला अाता विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्याच्या जागी संघामध्ये युवा अष्टपैलू खेळाडू गुरनुरला संधी देण्यात अाली. यासाठी त्याला २० लाख रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात अाले. अायसीसीच्या विश्वचषक विजेत्या भारतीय युवा संघाकडून अंगदची कामगिरी लक्षवेधी ठरली. यामुळे त्याला यंदा पंजाब संघाने २ काेटी रुपयांत करारबद्ध केले. मात्र, त्याला सलामी सामन्यात गंभीर दुखापतीला सामाेरे जावे लागले. यामुळे अाता त्याच्या जागी गुरनुरला संधी देण्याचा निर्णय घेण्यात अाला.

युवा खेळाडू गुरनुरने गत सत्रामध्ये पंजाब संघाकडून प्र‌थम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यासह त्याची कामगिरी लक्षवेधी ठरलेली अाहे. त्याच्या नावे पाच सामन्यांत १२०.२२ च्या स्ट्राइक रेटने १०७ धावांची नाेंद अाहे. याशिवाय त्याने ३.८० च्या इकाॅनाॅमीने ७ विकेट घेतल्या अाहेत.