आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In Reply, Gujarat's Ninth Win In 10 Matches; Defeated The Delhi Team For The Second Time In A Row

आयपीएल:प्रत्युत्तरात गुजरातचा 10 सामन्यांत नववा विजय; दिल्ली संघावर सलग दुसऱ्यांदा मात

दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माे. शमी (३/४१), राशिद (३/३१) आणि सामनावीर साई सुदर्शनने (नाबाद ६२) आपल्या गत चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाची यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमधील विजयी माेहीम कायम ठेवली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने मंगळवारी डेव्हिड वाॅर्नरच्या यजमान दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. गुजरात संघाने १८.१ षटकांमध्ये ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह गुजरात संघाने सलग दुसरा सामना जिंकून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर धडक मारली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाने प्रत्युत्तरात १० सामन्यात नववा विजय साजरा केला. तसेच गुजरातचा हा दिल्लीविरुद्ध सलग दुसरा विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्ली संघाने घरच्या मैदानावर ८ बाद १६२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयश्री खेचून आणली. साई सुदर्शनने ४८ चेंडूंमध्ये ४ चाैकार व २ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली.

गुवाहाटीत आज राजस्थान-पंजाब संघ समाेरासमाेर
गुवाहाटी | सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला राजस्थान राॅयल्स आणि पंजाब किंग्ज संघ आता आयपीएलमध्ये दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी राजस्थान राॅयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. हे दाेन्ही संघ आज बुधवारी गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. गुवाहाटीला इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपयीएल सामना आयाेजनासाठी यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.