आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In Shooting World Cup Idia Won Double Gold; Host India's Two Teams Became World Champions News And Updates

नेमबाजी वर्ल्डकप:डबल गोल्ड; यजमान भारताचे दोन संघ ठरले वर्ल्ड चॅम्पियन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला संघाची पोलंड, पुरुष संघाची व्हिएतनामवर मात; भारताच्या नावे ३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य
  • भारताचे दोन्ही संघ १० मी. एअर पिस्तूलमध्ये विजेते

आयएसएसएफ विश्वकपमध्ये भारताच्या नेमबाजांनी तिसऱ्या दिवशी आपला दबदबा राखला. रविवारी १० मीटर एअर पिस्तूलमध्ये भारताच्या महिला व पुरुष दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यशस्विनी सिंग देशवाल, मनू भाकर व श्रीनिवेता त्रिकुटाने अचूक नेम साधून पोलंड संघाला १६-८ ने पराभूत केले. यशस्वनीचे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले. तिने शनिवारी वैयक्तिक प्रकारात सुवर्ण वेध घेतला होता. त्यात मनूने रौप्यपदक मिळवले होते.

दुसरीकडे, यूथ ऑलिम्पिक व आशियाई सुवर्ण विजेत्या सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा व शाहजार रिझवी या भारतीय संघाने व्हिएतनामला १७-११ ने हरवले. भारत ३ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्य असे एकूण ८ पदकांसह तालिकेत अव्वलस्थानी आहे.

-मनू भाकर (19 वर्षे) : हरियाणाची मनू नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे. तिने विश्वकपमध्ये ८ सुवर्ण जिंकले . ती पहिल्याच यूथ ऑलिम्पिकमध्ये चॅम्पियन बनली. तिने बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंगमध्ये राष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

-श्रीनिवेता (25 वर्षे): तामिळनाडूच्या श्रीनिवेताने जर्मनीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे. तिने विश्वकपमध्ये प्रथमच सुवर्ण जिंकले. यासह तिने अापली लय कायम ठेवली.

- यशस्विनी (23 वर्षे): ऑलिम्पिक कोटा हाेल्डर यशस्विनी २०१० मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान नेमबाजी पाहायला गेली होती. त्यानंतर तिला हा खेळ आवडला. कुटुंबाने तिच्यासाठी नेमबाजी रेंजदेखील बनवली.

प्रत्येकी एक रौप्य व कांस्यपदक
रविवारी भारताला १० मीटर एअर रायफल पुरुष संघाने रौप्यपदक मिळवून दिले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, दीपक कुमार, पंकज कुमार यांचा संघ अमेरिका संघाकडून १४-१६ ने पराभूत झाला. कोरियाने कांस्यपदक मिळवले. दुसरीकडे, २० वर्षीय गनेमत सेखोंने महिला स्कीट प्रकारात कांस्यपदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...