आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In The Hundred Cricket Tournament | A Brilliant Half Century Of Maharashtra's Memory

द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत:महाराष्ट्राच्या स्मृतीचे शानदार अर्धशतक

साऊदम्पटन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या युवा महिला फलंदाज स्मृती मानधनाने द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी ट्रेंट राॅकेट्सविरुद्ध सामना गाजवला. तिने सदर्न ब्रेव्ह संघाचे प्रतिनिधित्व करताना सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकवले. तिने ३१ चेंडूंत नाबाद ५७ धावांची खेळी केली. याच झंझावाताच्या बळावर ब्रेव्ह संघाने १० गड्यांनी राॅकेट्सला धूळ चारली.

या दणदणीत विजयासह ब्रेव्ह संघाला स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. प्रथम फलंदाजी करताना राॅकेट्स संघाने निर्धारित १०० चेंडूंत ८ बाद ८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात ब्रेव्ह संघाला ४४ चेंडू व १० गडी राखून विजयाची नोंद करता आली.

बातम्या आणखी आहेत...