आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In The Men's Singles At The Olympics, B. Sai Praneeth Is The Only Indian Badminton Player

दिव्य मराठी इंटरव्ह्यु:अाॅलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू

शेखर झा | रायपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रचंड मेहनतीतून अाॅलिम्पिक पदकाची माेठी अाशा : प्रणीत

बॅडमिंटनपटूंच्या वाढत्या संख्येने आगामी टाेकियो अाॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याची माेठी अाशा हाेती. मात्र, पात्रता फेरी हाेऊ न शकल्याने भारताच्या अनुभवी खेळाडूंना माेठा फटका बसला. यातून त्यांना अाॅलिम्पिकचा काेटा संपादन करता अाला नाही, अशा शब्दांत भारतीय गुणवंत बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने खंत व्यक्त केली.

ताे अाॅलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत खेळणारा भारताचा एकमेव बॅडमिंटनपटू असेल. प्रणीत सध्या काेराेना महामारीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कसून मेहनत घेत अाहे. त्याने २०१९ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यासह त्याने ३६ वर्षानंतर जागतिक स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारताला पदक मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला. त्याने जागतिक क्रमवारीतून अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापले स्थान निश्चित केले.

दिग्गज बॅडमिंटनपटू पात्र ठरू शकले नाहीत. त्याचा अाता टीमवर काही दबाव अाहे का? सध्याची परिस्थिती फारच कठीण अाहे. दररोज नवीन आव्हाने समोर येत आहेत. यातून काही गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि आपल्याला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. अाॅलिम्पिकमध्ये भारताकडून माेठ्या संख्येत बॅडमिंटनपटू असते, तर सर्वांचा उत्साह वाढला असता. यातून सर्वांनी एकमेकांना मानसिक पाठबळ दिले असते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे अव्वल कामगिरी करण्याची आपली मानसिकता बदलणार नाही. आम्ही भारताला पदक मिळवून देण्यासाठी सर्वाेत्तम कामगिरी करणार अाहाेत.

तुझी पहिलीच अाॅलिम्पिक स्पर्धा अाहे, यासाठीची तयारी कशी झाली?
पहिल्यांदाच अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेत असल्याने अानंदी अाहे. मात्र, अव्वल कामगिरी करण्यासाठीचे थाेडे दडपणही अाहे. सध्या काेराेना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली अाहे. अशा संकटात मी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील अाहे. आता एका वर्षापासून मी कामगिरीचा दर्जा उंचावण्यावर अधिक मेहनत घेत अाहे. याशिवाय स्वत:चा फिटनेसही कायम ठेवण्याचे अाव्हान अाहे. त्यामुळे हे सर्व याेग्य पद्धतीने करत मी तयारी करत अाहे.

अाॅलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी कशी असेल, पदकाची काय स्थिती?
अाम्ही प्रत्येक जण या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहाेत. त्यामुळे निश्चितपणे भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील. यातून पदक जिंंकण्याच्या अाशाही अाहेत. त्यामुळे हा पल्ला गाठण्यासाठी प्रत्येक जण कसून मेहनत करत अाहे.

साई, फेडरेशनची मदत मिळाली?
हाेय. काेराेना काळात साई अाणि बॅडमिंटन फेडरेशनची माेलाची मदत मिळाली. त्यामुळे सरावाचा प्रश्न सुटला अाणि मनावरचे दडपण दुर झाले.

बातम्या आणखी आहेत...