आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • In The Race Of Life, 'Flying Sikh' Runs Towards Infinity ...; Milkha's Last Breath 5 Days After The Death Of His Wife Nirmal

‘फ्लाइंग सिख’:जीवनाच्या शर्यतीत मिल्खा सिंग यांची अनंताकडे धाव; पत्नी निर्मल यांच्या निधनानंतर 5 दिवसांनी मिल्खांचा अखेरचा श्वास

चंदीगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म: 20-11- 1929, निधन: 18-06-2021 - Divya Marathi
जन्म: 20-11- 1929, निधन: 18-06-2021
  • मिल्खा कोरोनामुक्त झाले होते, शुक्रवारी रात्री 11:24 वाजता निधन

महान धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग (९१) यांचे शुक्रवारी रात्री ११:२४ वा. रुग्णालयात निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. ३ जूनला त्यांना पुन्हा पीजीअायमध्ये भरती केले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही १३ जूनला निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा शेवटचा संवाद असेल, असे वाटले नव्हते.’ २० नोव्हेंबर १९२९ ला पाकिस्तानाच्या फैसलाबादेत जन्मलेले मिल्खा १९४७ मध्ये दंगलींतून जीव वाचवून भारतात आले. यानंतर ते १९६० मध्ये पहिल्यांदा पाकला गेले. तेथे त्यांना ‘फ्लाइंग सिख’ची उपाधी देण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी वाहली श्रद्धांजली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन महान धावपटू मिल्का सिंग यांना श्रद्धांजली वाहली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खाने असंख्य भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान कोरले होते. मिल्खाच्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना लाखो लोकांचे आवडते बनविले. त्यांच्या मृत्यूमुळे मी दु: खी आहे.

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण देणारे पहिले धावपटू
मिल्खांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ते पहिले धावपटू होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली. तथापि, त्यापेक्षा त्यांची जास्त चर्चा रोम ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यामुळे होती. १९६० मध्ये रोमला जाण्याच्या दोन वर्षे आधीच मिल्खांनी कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकतील, अशी त्यांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला अपेक्षा होती.

पाकिस्तानीही खुश व्हायचे
मिल्खा एखाद्या देशात तिरंगा घेऊन उतरत, जिंकत, तिरंगा पांघरून फिरत तेव्हा पाकमध्येही आनंदोत्सव साजरा होत असे. त्यांच्या विजयावर पाकिस्तानही आनंदी होत होता.

बातम्या आणखी आहेत...