आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोविड-१९ नंतर इतर सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र, व्यायामशाळा अद्याप बंद आहेत. त्यामुळे खेळाडू आणि लोकांचा फिटनेससाठी देशी व्यायामाकडे कल वाढला आहे. देशी व्यायामशाळा म्हणजे घरातील साहित्याच्या मदतीने घरीच सराव करणे. खेळाडूंनी घरात असलेल्या वस्तूंचा वापर वजन स्वरूपात करत केवळ सराव सुरू केला नाही तर आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केला. काही व्यायामशाळा चालक आपल्या येथे देशी साहित्याची व्यवस्था करत आहेत. व्यायामशाळा सुरू झाल्यानंतर लोक आपल्या सवयीप्रमाणे त्या माध्यमातून फिटनेस कायम ठेवू शकतील. विदेशीसारखे देशी साहित्यही फिटनेस चांगल्या प्रकारे बनवते. २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या जागतिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपचा सुवर्ण विजेता शुभम प्रतापसिंगने म्हटले, “लॉकडाऊनमध्ये व्यायामाशाळेच्या बाबतीत खेळाडूंचा कल बदलला आहे. लोक व्यायाम करण्यासाठी घरातील वस्तूचा उपयोग करत फिटनेस बनवत आहेत.
जुना काळ परतला, देशी व्यायामशाळांना पसंती
विदेशी व्यायामशाळेत उपयोग होत असलेल्या अत्याधुनिक मशीनप्रमाणे देशीमध्ये टायर, व डंबेल्स उचलून वेट ट्रेनिंग करू शकतो. देशी काॅर्डियोसाठी घरातच पायऱ्या चढणे-उतरणे आणि स्टूलवर उडी मारणे हे सोपे साधन आहे. जुन्या काळात मल्ल व खेळाडू देशी साहित्याचा उपयोग करत असत. त्यामुळे त्याचे शरीर दीर्घकाळ जसेच्या तसे राहत होते. प्रो. विल्फ्रेड वाज, डायरेक्टर अॉफ फिटनेस सेंटर, लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन (एलएनआयपीई)
वैद्यकीय तपासणीनंतर वेळापत्रक; माेठा धाेका टाळता येताे
पूर्वीच्या काळात व्यक्तींना ६० ते ७० च्या वयात असताना व्याधींची लागण हाेत असे. मात्र, अाता हे अंतर फारच कमी झाले. सध्या २५ ते ३० वयाेगटातील युवा तरुणांना विविध व्याधी हाेत अाहे. अशात या सर्वांच्या दैनंदिनीमध्ये बदल झाला. त्यानुसार अाताच कसरती करून पुढचा धाेका टाळला पाहिजे. नित्यनेमाने व्यायाम, याेगातून अापण फिट राहू शकताे याची सर्वांनी तयारी करावी, असेही शुभम प्रतापने या वेळी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.