आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Inclusion Of Women's T20 Cricket For The First Time In The 2022 Commonwealth Games; According To The Current Rankings, The Entry Of The Indian Team Is Certain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी:2022 कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच महिला टी-20 क्रिकेटचा समावेश; सध्याच्या क्रमवारीनुसार भारतीय संघाचा प्रवेश निश्चित

दुबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या स्पर्धेत दुसऱ्यांदा क्रिकेटला स्थान मिळाले, यापूर्वी 1998 मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश केला होता

महिला क्रिकेट पहिल्यांदा २०२२ बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळवले जातील. एकूण क्रिकेटचा विचार केल्यास या स्पर्धेत दुसऱ्यांदा या खेळाला स्थान मिळाले. या पूर्वी १९९८ मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धेसाठी आयसीसीने बुधवारी पात्रतेचे नियम घोषित केले. यजमान इंग्लंड व क्रमवारीतील अव्वल-६ टीम थेट पात्र ठरतील. आठव्या व अखेरच्या टीमसाठी पात्रता सामने खेळवले जातील. पात्रता कोणत्या आधारे होईल, त्याची घोषणा नंतर केली जाईल. स्पर्धेत एकूण आठ संघ खेळतील. महिला टी-२० स्पर्धेचे महत्त्व वाढले, कारण ऑस्ट्रेलिया झालेल्या टी-२० विश्वचषकाची फायनल पाहण्यासाठी ८६ हजार प्रेक्षक आले होते.

क्रमवारीत भारतीय महिला टीम तिसऱ्या स्थानी

टी-२० क्रमवारीमध्ये इंग्लंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या, न्यूझीलंड चौथा, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि वेस्ट इंडीज सहाव्या स्थानी आहे. इंग्लंड यजमान असल्याने त्यांना स्पर्धेत स्थान मिळले. अशात क्रमवारीतील सातव्या स्थानावरील पाकिस्तानला संधी मिळू शकते. अशात स्पर्धेच्या पात्रतेसाठी १ एप्रिल २०२१ ची क्रमवारी पाहिली जाईल. पात्रता सामने ३१ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित जातील. स्पर्धेतील सामने १८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान होतील.

बातम्या आणखी आहेत...