आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Increased Participation Of Female Athletes In Olympic Qualification; Winning Medals Is Earning The Country The Highest Honor; News And Live Updates

महिला खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी:ऑलिम्पिक पात्रतेत महिला खेळाडूंचा सहभाग वाढला; पदके जिंकून देशाला मिळवून देत आहेत सर्वोच्च बहुमान

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला खेळाडूंनी बर्म्युडा, फिलिपाइन्सला मिळवून दिले पहिले ऑलिम्पिक गोल्ड

टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी महिलांची संख्या ही जवळपास ४८.८ टक्के अाहे. गत २१ वर्षांत अाॅलिम्पिक स्पर्धेतील महिला खेळाडूंच्या सहभागात १० टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे महिला खेळाडूंनी पदकांमध्येही वर्चस्व निर्माण करण्यास अागेकूच केली. याचे संकेत बर्म्युडा व फिलिपाइन्सच्या महिलांनी अाॅलिम्पिक चॅम्पियनचा बहुमान पटकावत दिले. तुर्कमेनिस्तानला पहिले अाॅलिम्पिक पदक महिलेच मिळवून दिले.

फिलिपाइन्स : डियाज ठरली देशाची पहिली सुवर्णपदक विजेती; विश्वविक्रमवीर लियाअाेला टाकले मागे
फिलिपाइन्सची वेटलिफ्टर हिडिलिन डियाजने मंगळवारी अाॅलिम्पिक चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. यासह ती अाॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी फिलिपाइन्सची पहिली खेळाडू ठरली. ३० वर्षीय डियाजने ५५ किलाे वजन गटात साेनेरी यश मिळवले. यादरम्यान तिने पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विश्वविक्रमवीर लियाअाे कियुनला मागे टाकले. त्यामुळे तिचे हे साेनेरी यश काैतुकास्पद ठरले. अातापर्यंत केलेल्या प्रचंड मेहनतीतून तिला हा अाॅलिम्पिक चॅम्पियन हाेण्याचा पल्ला गाठता अाला.

तुर्कमेनिस्तान : वेटलिफ्टर पाेलिनाने जिंकले पदक; जिम्नॅस्टिकमध्ये केली हाेती काैतुकास्पद कामगिरी
टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत पाेलिना गुरयेवाने वेटलिफ्टिंग प्रकारात राैप्यपदक पटकावले. तिने ५९ किलाे वजन गटात हे यश संपादन केले. तिने वेटलिफ्टिंगसह जिम्नॅस्टिक खेळ प्रकारातही तरबेज हाेती. या खेळातही तिने लक्षवेधी कामगिरी करताना करिअर घडवण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, काही कारणामुळे हे साेडून तिने वेटलिफ्टिंगला पसंती दिली. यासह ती यात यशस्वी ठरली. वेटलिफ्टिंगमध्ये जपानच्या मिकीकाेने कांस्य अाणि तैवानच्या कुअाे सिंगने राैप्यपदकाची कमाई केली. पाेलिनाने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धेत २८ वे स्थान गाठले हाेते.

बर्म्युडा : ट्रायथलाॅनमध्ये फ्लाेरा डफी ठरली अाॅलिम्पिक चॅम्पियन; सुवर्ण जिंकणारी सर्वात लहान देशाची खेळाडू
बर्म्युडा देशाची फ्लाेरा डफी ही अाॅलिम्पक चॅम्पियन ठरली. तिने ट्रायथलाॅनमध्ये हे साेनेरी यश संपादन केले. या ३३ वर्षीय खेळाडूने एक तास ५५ मिनिटे ३३ सेकंदांत निश्चित अंतर गाठले. तिने करिअरमध्ये चाैथ्यांदा अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नाेंदवला. तिने या इव्हेंटमध्ये ५६ खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. यासह अाॅलिम्पिक चॅम्पियन ठरलेली फ्लाेरा ही सर्वात लहान देशाची खेळाडू ठरली. त्यामुळे तिचे हे यश मंगळवारी चर्चेत अाले. ‘अापल्या देशातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असे यश संपादन केले. यातून अनेक गुणवंत खेळाडू घडतील, अशी प्रतिक्रीया तिने दिली.

बातम्या आणखी आहेत...