आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IND Vs AUS 1st ODI Moments Rajnikanth Siraj Ronaldo Virat Natu Natu  

भारत-ऑस्ट्रेलिया वनडेचे मोमेंट्स:स्टेडिअममध्ये सचिन...सचिनचा जयघोष; जडेजाचा अचंबित करणारा झेल, 'नाटू-नाटू'वर कोहलीचा डान्स

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने 3 वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा एकदिवसीय सामना रविवारी विशाखापट्टणम येथील मैदानावर होईल. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात डायव्हिंग झेल घेणारा भारताचा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.

दुसरीकडे ही मॅच पाहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत व्हीआयपी विंगमध्ये दिसून आले. स्टेडिअम सचिन...सचिन...च्या घोषणांनी गुंजले..., तर मोहम्मद सिराजने फुटबॉलपटू रोनाल्डोच्या शैलीत आनंदोत्सव साजरा केला. चला तर जाणून घेऊया... या सामन्यातील टॉप मोमेंट्स....

1. जडेजाचा शानदार डायव्हिंग झेल
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. रवींद्र जडेजाने त्याला हार्दिक पांड्याकडून झेलबाद केले. त्यानंतर जडेजाने मार्नस लाबुशेनचा शानदार डायव्हिंग झेल टिपला. कुलदीप यादवने 23व्या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपवर टाकला. लाबुशेन कट करतो तेव्हा जडेजा शॉर्ट थर्ड मॅनमधून बॅकवर्ड पॉइंटकडे धावतो. तर झेल घेण्यासाठी 10 फूट लांब डायव्ह करतो.
त्यामुळे लाबुशेनला केवळ 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर जडेजाने ग्लेन मॅक्सवेलची विकेटही घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात केएल राहुलसोबत 108 धावांची नाबाद भागीदारी करत त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

रवींद्र जडेजाने मार्नस लबुशेनला उत्कृष्ट डायव्हिंग झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
रवींद्र जडेजाने मार्नस लबुशेनला उत्कृष्ट डायव्हिंग झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

2. रजनीकांत यांनी पाहिला सामना
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार पोहोचले. यामध्ये अभिनेता रजनीकांत आणि अजय देवगण यांचाही समावेश होता. याशिवाय उद्योगपती आनंद महिंद्रा, महाराष्ट्राचे माजी देवेंद्र फडणवीस, आससीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन हेही पोहोचले. सर्वांनी व्हीआयपी विंगमध्ये बसून सामन्याचा आनंद लुटला.

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीही व्हीआयपी लाउंजमध्ये बसून भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहिला.
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीही व्हीआयपी लाउंजमध्ये बसून भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहिला.

3. रोनाल्डो शैलीत सिराजचा आनंदोत्सव
भारताच्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 29 धावांत 3 बळी घेतले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केल्यानंतर त्याने सीन अॅबॉट आणि अॅडम जंपाची विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटची विकेट घेतल्यानंतर सिराजने हवेत उडी घेतली. त्याचे सेलिब्रेशन पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोसारखे होते. विकेट घेतल्यानंतर सिराज अनेकदा असे सेलिब्रेशन करताना दिसून येतो.

विकेट घेतल्यानंतर रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज.
विकेट घेतल्यानंतर रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज.

4. स्टेडिअममध्ये गुंजले 'सचिन...सचिन..
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळायचा. वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या नावाने स्टँडही बांधण्यात आला आहे. सामन्यादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक 'सचिन...सचिन...' म्हणत होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडिअममध्ये सचिनशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या नावाचाही जयघोष करण्यात आला.

प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मुंबईचे वानखेडे स्टेडियम 'सचिन... सचिन...'च्या घोषणांनी दुमदुमले.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मुंबईचे वानखेडे स्टेडियम 'सचिन... सचिन...'च्या घोषणांनी दुमदुमले.

5. विराटचा 'नाटू-नाटू' गाण्यावर डान्स
सामन्याच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना भारताचा विराट कोहली ऑस्कर विजेत्या 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसला. पहिल्या पॉवरप्ले दरम्यान विराट स्लिपमध्ये उभा होता, त्यादरम्यान स्टेडियममध्ये नाटू-नाटू हे गाणे सुरू झाले, ज्यावर विराट थिरकला. विराट या सामन्यात फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही आणि त्याने 9 चेंडूत 4 धावा केल्या आणि वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच मिचेल स्टार्कचा बळी ठरला.

नाटू-नाटू गाण्याच्या स्टेप्सवर डान्स करताना विराट कोहली.
नाटू-नाटू गाण्याच्या स्टेप्सवर डान्स करताना विराट कोहली.

6. एकापाठोपाठ बाद झाले कोहली-सूर्या
189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातच संघाने इशान किशनची विकेट गमावली. त्याच्यानंतर पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर स्टार्कने एलबीडब्ल्यू केले. सूर्या बाद होताच भारताची धावसंख्या 16 बाद 3 अशी होती, त्यानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र शांतता पसरली. स्टार्कने 9.5 षटकात 3 विकेट्स घेत आपला स्पेल संपवला, पण यष्टिरक्षक केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने हा सामना 5 विकेट्सने जिंकला.

विराट कोहली एलबीडब्ल्यू होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.
विराट कोहली एलबीडब्ल्यू होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

7. शुभमन गिलचा झेल चुकला, 2 जीवदान मिळाले
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने पहिल्या डावात एक सोप्पी कॅच सोडली. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कट केला, पण चेंडू स्लिपमध्ये गेला. गिलने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातातून चुकला. गिलने ही चूक सुधारली त्यानंतर शेवटी मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट या ऑस्ट्रेलियन प्लेअरचे शानदार कॅच पकडली.

गिलने पहिल्या डावात असाच सोपा झेल सोडला.
गिलने पहिल्या डावात असाच सोपा झेल सोडला.
गिलने डावाच्या शेवटी पुन्हा डाय मारत झेल घेतला.
गिलने डावाच्या शेवटी पुन्हा डाय मारत झेल घेतला.

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेला गिलही नशीबवान ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि यष्टिरक्षक जोश इंग्लिश यांनी त्यांचे झेल सोडले. एलबीडब्ल्यू घोषित झाल्यानंतर तो रिव्ह्यूतून वाचला. त्याला या जीवदानाचाही फायदा घेता आला नाही आणि 11व्या षटकात स्टार्कच्या चेंडूवर तो पॉइंटवर उभ्या असलेल्या मार्नस लबुशेनकडे झेलबाद झाला. गिलने 31 चेंडूत 20 धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...