आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • IND VS AUS Boxing Test , Second Test Sydney Test The Audience Arrived To Watch The Boxing Test, Corona, All Isolates On The Stand; Now Mask Is Mandatory For Audience In Sydney Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाचे MCG बनले हॉटस्पॉट:बॉक्सिंग डे टेस्ट पाहण्यासाठी पोहोचलेल्या प्रेक्षकाला कोरोना, स्टँडमध्ये बसलेले सर्व आयसोलेट; सिडनीमध्ये प्रेक्षकांना मास्क आवश्यक

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेस्टर्न सिडनीच्या लोकांना तिसर्‍या कसोटीत प्रवेश मिळणार नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) खेळला गेला. ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या वृत्तानुसार, हे एक संभाव्य हॉटस्पॉट असू शकते. खरेतर, बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी आलेला एक प्रेक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. MCG नुसार सामन्याच्या दुसर्‍या दिवशी (27 डिसेंबर) प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचला होता.

अशा परिस्थितीत त्या स्टँडमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आयसोलेट केले आहे. तसेच या सर्वांच्या सिडनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासही बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंडही ठोठावला जाईल. याशिवाय तिसऱ्या कसोटीत दर्शकांना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. दुसरी कसोटी मेलबर्न येथे 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळली गेली होती. या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत बरोबरी साधली.

वेस्टर्न सिडनीच्या लोकांना तिसर्‍या कसोटीत प्रवेश मिळणार नाही
न्यू साउथ वेल्सचे (एनएसडब्ल्यू) आरोग्यमंत्री ब्रॅड हजार्ड म्हणाले की, पश्चिम सिडनीमध्ये आज कोरोनाचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता स्टेडियममध्ये जाण्यासाठी खासगी वाहने किंवा टॅक्सी वापर करावा.

बातम्या आणखी आहेत...