आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:भारत अ संघ 106 धावांनी विजयी

चेन्नई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत अ संघाच्या युवा गाेलंदाज राज बावा (४/४), राहुल चहर आणि कुलदीप यादवने (प्रत्येकी २ बळी) घरच्या मैदानावर भेदक माऱ्यातून पाहुण्या न्यूझीलंड अ टीमचा धुव्वा उडवला. यातून भारतीय संघाने मंगळवारी अनऑफिशियल तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली. यजमान भारताने १०६ धावांनी विजय साकारला. यातून भारताला ही घरच्या मैदानावरील वनडे मालिका ३-० ने आपल्या नावे करता आली. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ४९.३ षटकांत २८५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला ३८.३ षटकांत १७८ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला.