आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया चाैथी कसाेटी आजपासून:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेशासाठी टीम इंडिया उत्सुक

अहमदाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत सामन्यातील पराभवातून सावरलेला यजमान भारतीय संघ आता अहमदाबादच्या मैदानावरील कसाेटी विजयाची माेहीम फत्ते करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, यासाठीची टीम इंडियाची वाट काहीशी खडतर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला आज गुरुवारपासून सुरुवात हाेत आहे.

स्मिथच्या नेतृत्वाखाली पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने दमदार पुनरागमन करताना बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमधील तिसरी कसाेटी जिंकली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने इंदूरच्या मैदानावर भारतावर माेठा विजय संपादन केला. यातून ऑस्ट्रेलियाला चॅम्पियनशिप फायनलचा प्रवेश निश्चित करता आला. हा पराभव भारताच्या फायनलमधील प्रवेशात अडचणीचा ठरला. यामुळे टीमला अहमदाबादच्या मैदानावर विजय आवश्यक आहे. यासाठी टीमची कसाेटी लागण्याचे चित्र आहे. यातून टीम इंडियाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. या ठिकाणी आजपासून चाैथी कसाेटी रंगणार आहे. टीम इंडियासाठी ही कसाेटी प्रतिष्ठेची आहे. यातील विजयाने टीमला मालिका आपल्या नावे करता येईल, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रवेश निश्चित हाेईल. यामुळे राेहित शर्माने संघात काहीसे बदल करण्याचे संकेत दिले. यातून गाेलंदाज सिराजला विश्रांती देण्यात येईल. त्याच्या जागी शमीला संधी मिळणार आहे. गिलचे स्थान कायम आहे. टीम इंडियाची घरच्या मैदानावरील गत दहा वर्षांपासूनची कसाेटी मालिका विजयाची माेहीम आता अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...