आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आजपासून भारत-बांगलादेश सलामीची कसाेटी रंगणार

चितगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यातील सलामीच्या कसाेटीला बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. चितगावच्या जहूर अहमद चाैधरी मैदानावर सकाळी ९ वाजेपासून हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. नियमित कर्णधार राेहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये सध्या लाेकेश राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाला आतापर्यंत कसाेटीमध्ये बांगलादेश टीमविरुद्ध वर्चस्व अबाधित ठेवता आले. यातून टीम इंडियाने २००० पासून आतापर्यंत बांगलादेश टीमविरुद्ध ११ कसाेटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने ९ कसाेटीत विजय संपादन केले. तसेच दाेन सामने बराेबरीत राहिले हाेते. त्यामुळे आता भारतीय संघ दहावा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...