आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Can Benefit From The Absence Of Fans In The Olympics, Athletes Mentally Strong: Gloucester; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:ऑलिम्पिकमध्ये चाहत्यांच्या अनुपस्थितीचा भारताला होऊ शकतो फायदा, खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत : ग्लॉस्टर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्लॉस्टर ऑलिम्पिकच्या 11 भारतीय खेळाडूंसोबत जोडले आहेत

स्पर्धेदरम्यान चाहत्यांना प्रवेश नसल्याने भारतीय खेळाडूंना फायदा होईल. कारण, कोरोनादरम्यान खेळाडूंनी आपल्या मानसिक आरोग्यावर खूप काम केले आहे. खेळाडू आता मानसिकदृष्ट्या मजबूत झाले, असे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ११ खेळाडूंसोबत जोडलेल्या फिजिओथेरपिस्ट जॉन ग्लॉस्टर यांनी म्हटले. ऑस्ट्रेलियाचे ग्लॉस्टर तलवारपटू भवानी देवी, बॅडमिंटनपटू बी.साईप्रणीत, चिराग शेट्टी, थाळीफेकपटू कमलप्रीत कौर आणि जलतरणपटू सजन प्रकाशसह अनेक खेळाडूंसोबत काम करत आहेत.

ते २००५ ते २००८ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओ होते. ते आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचेदेखील फिजिओथेरपिस्ट होते. ग्लॉस्टर यांनी म्हटले की,‘पूर्वी मला वाटत होते की, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंची कामगिरी गत ऑलिम्पिकच्या तुलनेत चांगली हाेणार नाही. या गोष्टीचा विचार केवळ भारतीय नाही तर विदेशी खेळाडूंबाबतही करत होतो. आता माझा विचार बदलला आहे. आता मला वाटते की, खेळाडू पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करतील.

कारण कोरोनामुळे त्यांनी मानसिक बाबींवर खूप काम केले आहे.’ ग्लॉस्टर यांनी २०१९ मध्ये टोकियोत जावून तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आपला अनुभव खेळाडूंना सांगितला. त्यांनी म्हटले की,‘प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंना फायदा होईल. कारण त्यांना काही खेळात रिकाम्या स्टेडियममध्ये किंवा खूप कमी प्रेक्षकांसमोर खेळण्याची सवय आहे. अनेकांसाठी ही संधी आहे.’

बातम्या आणखी आहेत...