आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Defeated West Indies By 88 Runs In Fifth T20 Match; All Wickets In The Name Of Spinners | Marathi News

भारत VS वेस्‍ट इंडिज टी-20:पाचव्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 88 धावांनी केला पराभव; भारताने 4-1 ने जिंकली मालिका

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने पाचव्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 88 धावांनी एकतर्फी पराभव केला. यासह पाच सामन्यांची मालिका भारताने 4-1 ने जिंकली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 188 धावा केल्या. सलामीला आलेल्या श्रेयस अय्यरने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. दीपक हुडाने 38 आणि कर्णधार हार्दिक पांड्याने 28 धावा केल्या.

त्यानंतर खेळण्यासाठी आलेला वेस्ट इंडिजचा संघ 15.4 षटकांत सर्वबाद 100 धावांवर आटोपला.यजमानांकडुन शिमरॉन हेटमायरने 56 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.