आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या बुधवारपासून कसाेटी मालिका रंगणार:भारत 300 शतके करणारा पहिला संघ; बांगलादेशवर 227 धावांनी मात

चितगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने दाैऱ्याचा शेवट दणदणीत विजयाने गाेड केला. प्रभारी कर्णधार राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात यजमान बांगलादेशवर २२७ धावांनी मात केली. भारताने मालिकेत विजयाचे खाते उघडले. मात्र, भारताने ही तीन वनडे सामन्यांची मालिका १-२ ने गमावली. ईशान किशन (२१०) आणि काेहलीच्या (११३) खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमाेर विजयासाठी ४१० धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला ३४ षटकांत १८२ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. भारतीय संघाला काेहलीने विक्रमाचा पल्ला गाठून दिला. भारत वनडे फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक ३०० शतके साजरे करणारा एकमेव संघ ठरला. आता भारत आणि बांगलादेश संघ दाेन कसाेटी सामन्यांच्या मािलकेत समाेरासमाेर असतील. बुधवारपासून कसाेटी मालिकेला सुरुवात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...