आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India New Zealand Decider Today, T20 Match; Broadcast From 12.00 PM Onwards

टी-20:भारत-न्यूझीलंड आज निर्णायक सामना, टी-20 सामना; प्रक्षेपण दुपारी 12.00 वाजेपासून

नेपियर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता दाैऱ्यावर टी-२० मालिका विजयाची माेहीम फत्ते करण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि यजमान न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी मालिकेतील तिसरा शेवटचा टी-२० सामना हाेणार आहे. नेपियरच्या मैदानावर हे दाेन्ही संघ दुपारी १२ वाजेपासून समाेेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांसाठी हा निर्णायक सामना आहे. भारताने दुसरा सामना जिंकून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा कर्णधार हार्दिकचा मानस आहे. यासाठी आता सॅमसन आणि उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे आता त्याला शेवटच्या सामन्यादरम्यान विश्रांती दिली जाणार आहे. यातून आता सॅमसनला माेठी खेळी करण्याची संधी आहे.

दुसरीकडे यजमान न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार विलियम्सन तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी टीम साैदीकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली आहे. तसेच विलियम्सनच्या जागी संघामध्ये मार्क चॅपमॅनला सहभागी करण्यात आले आहे. आता नव्या कणॅधाराची या सामन्यात माेठी कसरत हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...