आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India New Zealand Third ODI Today | India Will Become The Number One Team Today With A Win, The Broadcast Of The Match Will Be From 2.1.30 Pm

भारत-न्यूझीलंड आज तिसरा वनडे:विजयाने भारत आज हाेणार नंबर वन संघ, सामन्याचे प्रक्षेपण दु.1.30 वाजेपासून

इंदूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची २-० ने विजयी आघाडी

मालिका विजयाने फाॅर्मात असलेल्या भारताला आता जगातील नंबर वन वनडे संघ हाेण्याची संधी आहे. यापासून टीम इंडिया अवघ्या एका पावलावर आहे. यासाठी भारताला मंगळवारी इंदूरच्या मैदानावर विजय साजरा करावा लागणार आहे. पराभवाने न्यूझीलंड टीमची चाैथ्या स्थानी घसरण हाेणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर तिसरा वनडे सामना हाेणार आहे. यातील विजयाने भारतीय संघाला आयसीसीच्या वनडे क्रमवारीत माेठी झेप घेता येईल. ११३ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेला भारतीय संघ विजयाने अव्वलस्थानी विराजमान हाेऊ शकेल.

उमरान, शाहबाजला संधी; शमी, सिराजला विश्रांती
भारती यजमान भारतीय संघाकडून इंदूरच्या मैदानावरील तिसऱ्या वनडेसाठी युवा वेगवान गाेलंदाज उमरान मलिक आणि शाहबाजला संधी मिळण्याचे चित्र आहे. यातून वेगवान गाेलंदाज सिराज व शमीला विश्रांती दिली जाईल. सलगच्या दाेन विजयांनी टीम इंडियाने ही ३ वनडे सामन्यांची मालिका २-० ने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...