आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Ready For Commonwealth Games; Pro League, Indian Men's And Women's Opener Against Belgium From Today

हॉकी:राष्ट्रकुलच्या तयारीसाठी भारत सज्ज; आजपासून प्रो लीग, भारतीय पुरुष व महिला संघाची सलामी लढत  बेल्जियमविरुद्ध

अंंतवर्पे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघ आता आगामी राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. याच तयारीसाठी भारताच्या दाेन्ही संघांनी एफआयएचच्या आयाेजित प्राे हॉकी लीगमध्ये सहभाग घेतला. यामध्ये विजयी सलामीसाठी भारताचे महिला आणि पुरुष संघ शनिवारी बेल्जियमच्या मैदानावर उतरणार आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाचा लीगमधील सलामी सामना यजमान बेल्जियमविरुद्ध होणार आहे. तसेच यादरम्यान भारतीय महिला संघाचा सामना यजमान बेल्जियमसोबत होणार आहे. त्यानंतर भारताच्या दाेन्ही संघांचा दुसरा सामना उद्या रविवारी यजमान बेल्जियमविरुद्ध रंगणार आहे. भारताचा पुरुष संघ प्राे लीगच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. टीमच्या नावे २७ गुण आहेत. भारतीय पुरुष संघ या लीगमध्ये १८ आणि १९ जून राेजी हॉलंडविरुद्धही दाेन सामने खेळणार आहे. २८ जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होणार आहे

बातम्या आणखी आहेत...