आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Strong With Spin; Pakistan's Strong With Pacers, India Pak Match Two Days Left | Marathi News

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:भारत फिरकीने भक्कम; पाकची मदार पेसर्सवर, भारत-पाक सामन्याला दाेन दिवस शिल्लक

चंद्रेश नारायणन | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल ३०९ दिवसांनंतर समाेरासमाेर असतील. क्रिकेटच्या विश्वातील या दाेन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये रविवारी आशिया कप स्पर्धेचा सामना रंगणार आहे. येत्या शनिवारपासून यूएईमध्ये टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. यादरम्यान जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या स्पर्धेतील भारत आणि पाक यांच्यात हाेणाऱ्या हाय हाेल्टेज सामन्याकडे लागले आहे. गतवेळच्या टी-२० विश्वचषकानंतर पहिल्यांदाच हे दाेन्ही संघ मैदानावर झंुजणार आहेत. सात वेळच्या आशिया कप विजेता भारतीय संघ राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेतील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण टीम इंडियाने सत्रात टी-२० फाॅरमॅटमध्ये सामन्यागणिक विजयाची नाेंद केली आहे. पाकची वेगवान गाेलंदाजी ही मजबूत बाजू मानली जाते. मात्र, टीमचा युवा वेगवान गाेलंदाज आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

फलंदाजी
भारतीय संघात स्टार खेळाडूंचे कमबॅक; पाक संघाकडे ऑलराउंडर बॅटिंग लाइनअप

भारत- अनेक खेळाडू हे दीर्घ काळानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन करत आहेत. त्यामुळे टीमची फलंदाजी अधिक मजबूत मानली जात आहे. झिम्बाव्वे दाैऱ्यावर कर्णधार राहुलने नेतृत्वात वनडे मालिका जिंकून दिली. काेहलीही सध्या सुमार खेळीमुळे चर्चेत आहे. ऋषभही फाॅर्म टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पाकिस्तान- अनुभवी शाेएब मलिक आणि हाफिजच्या अनुपस्थितीत पाक संघ नव्या रूपात दिसत आहे. कर्णधार बाबर आझम व रिझवान दमदार सुरुवात करून मधल्या फळीचा आत्मविश्वास उंचावणार आहेत. फखर, आसिफ, हैदर, इफ्तिखारही आता भारतविरुद्ध स्फाेटक फलंदाजीसाठी उत्सुक आहेत.

गाेलंदाजी
भारताची मदार फिरकीवर, चाैघांना माेठी संधी; पाकला वेगवान गाेलंदाजांचे पाठबळ
भारत- फिरकीपटूंमुुळे भारतीय संघ मजबूत मानला जात आहे. यासाठी चार फिरकीपटूंची खास निवड केली आहे. यात अश्विन व जडेजा या अष्टपैलूंचा समावेश आहे. विश्वासू चहल या सर्वांचा आत्मविश्वास उंचावणार आहे. रवी बिश्नाेईही फाॅर्मात आहे. मात्र, वेगवान गाेलंदाजांची फळी काहीशी दुबळी आहे.

पाकिस्तान- वेगवान गाेलंदाजीच्या आक्रमणासाठी पाक संघाकडे अनेक पर्याय आहेत. मात्र, तरीही आफ्रिदीची उणीव भासणार आहे. दरम्यान टीमला नसीम शाह, हॅरिस रऊफ, शाहनवाज दहानीकडून माेठी आशा आहे. फिरकीची बाजू उस्मान कादीर, माे. नवाज आणि शादाब खान हे सांभाळणार आहेत. त्यांच्याकडून टीमला आशा आहे.

अष्टपैलू
फाॅर्मात असलेल्या फळीमुळे भारतीय संघ मजबूत; पाकसमाेर संथ फलंदाज अडचणीचे
भारत- हार्दिकचे पुनरागमन हे भारतीय संघासाठी वरदान मानले जात आहे. त्याच्या चेंडूमध्ये वाऱ्याचा वेग आहे. याशिवाय ताे फलंदाजीमध्येही तरबेज आहे. यादरम्यान रवींद्र जडेजा आणि अश्विनही उपयाेगी अष्टपैलू म्हणून संघात आहेत.

पाकिस्तान- पाकिस्तान संघाला आता शादाब, नवाजकडून माेठ्या खेळीची आशा आहे. याशिवाय नसीम हा अष्टपैलू खेळाडूही स्वत:ची क्षमता सिद्ध करू शकताे. त्याच्याकडून गाेलंदाजी व फलंदाजीत माेठ्या खेळीची आशा आहे.

100 वा टी-२० सामना खेळणार काेहली करिअरमधील. हे यश संपादन करणारा दुसरा भारतीय व १४ वा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरेल.

सध्याची कामगिरी
भारत- भारतीय संघाने गत टी-२० विश्वचषकांनंतर सर्वच टी-२० सामने जिंकले आहेत. यादरम्यान नवा कर्णधाराचा प्रयाेगही संघाने यशस्वीपणे राबवला.

पाकिस्तान : एप्रिलनंतर आतापर्यंत पाक संघाने एकही टी-२० सामना खेळला नाही. त्यामुळे या फाॅरमॅटमध्ये संघाची माेठी कसरत हाेणार आहे.

क्षेत्ररक्षण
भारताकडे जडेजा, हार्दिक, सूूर्यकुमारच्या भूमिकेत सर्वाेत्तम क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा मैदानावर दबदबा राहणार अाहे. क्षेत्ररक्षणात पाक सातत्याने अपयशी ठरत आहे. टीमचा शादाब हा सर्वाेत्तम क्षेत्ररक्षक आहे. मात्र, त्याला सुटलेल्या एका झेलची किंमत गत वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात माेजावी लागली.

संघ निवड कर्णधार राेहितसाठी आव्हानात्मक
या ब्लॅकबस्टर सामन्यापूर्वी राेहित शर्मासाठी संघ निवड ही डाेकेदुखीच आहे. राेहित आणि राहुल हे दाेघेही सलामीला असतील. काेहली तिसऱ्या, सूर्यकुमार चाैथ्या, ऋषभ पंत पाचव्या स्थानावर खेळतील. त्यानंतर काेण असेल हे निश्चित करावे लागेल.

दिनेश कार्तिक की दीपक हुडा : एक सर्वाेत्तम फिनिशर तर दुसरा जबरदस्त ऑलराउंडर आहे. भारतीय संघासाठी सहाव्या गाेलंदाजाचा उत्तम पर्याय आहे. दीपक हुडाची आघाडीची फलंदाजी लक्षवेधी ठरली हाेती. त्याने यादरम्यान शतकही साजरे केले हाेते. कार्तिकने सातव्या स्थानावरून विजय निश्चित केला हाेता. दीपक सहाव्या व हार्दिक हा सातव्या स्थानी खेळेल. यातून अनुभवी कार्तिकला बाहेर बसावे लागेल.

भुवनेश्वर कुुमारला कुणाची असेल साथ : गत इंग्लंड आणि विंडीज दाैऱ्यानंतर आता अर्शदीपच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठी आवेश आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह व हर्षलच्या अनुपस्थितीत भुवनेश्वरसाेबत अर्शदीपला संधी मिळू शकेल. त्याने ६ सामन्यांत ९ बळी घेतले. त्याची यादरम्यानची कामगिरी ही अधिक लक्षवेधी ठरली हाेती.

वर्ल्डकपनंतर कामगिरीत बदल : भारतीय संघाने दूर केले कच्चे दुवे; खेळाची शैली झाली वेगवान
गतवर्षी टी-२० विश्वचषकात पाक संघाविरुद्ध पराभवानंतर टीम इंडियाने आपली दुबळी बाजू पूर्णपणे दूर केली. यातून टीमने खेळण्याच्या दृष्टिकाेनात कमालीचा बदल केला. त्यामुळे टीमच्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. यातून आता याच फाॅरमॅटमध्ये भारतीय संघाला आपली विजयी माेहिम कायम ठेवता आली. यात टीमची कामगिरही दर्जेदार ठरली आहे.

रन-रेट गतिमान : प्रथम फलंदाजी करतानाही टीम इंडियाने कायम ठेवली विजयी माेहीम
शास्त्री-कोहली यांच्या काळात भारतीय संघ हा प्रत्युत्तरात अधिक वरढच ठरत हाेता. त्यामुळे प्रतिस्पर्धीने दिलेले विजयाचे माेठे लक्ष्यही सहजपणे गाठण्यात टीम इंडिया अधिक सक्षम हाेती. आत २०२० पासून २०२१ विश्वचषकापर्यंत टीम इंडियाने प्रथम फलंदाजीतही रन-रेट उंचावत विजय संपादन केले आहेत. यातून प्रथम फलंदाजीत भारताने १५ पैकी सात सामने जिंकले. तसेच प्रत्युत्तरात ८ पैकी ७ विजय नाेंदवले.

अविस्मरणीय किस्सा
आफ्रिदीने कराचीत भारतीय खेळाडूंसाठी तयार केले खास शाकाहारी रुचकर जेवण
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचे गत काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाेबतचे मैत्रीचे संबंध आता बिघडवले आहेत. मात्र, एकेकाळी ताे भारतीय संघातील खेळाडूंचा जवळचा मित्र मानला जात हाेता. याच मैत्रीतून त्याने २००६ मध्ये पाक दाैऱ्यावर आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी खास स्वत:च्या हाताने रुचकर व स्वादिष्ट असे जेवण तयार केले हाेते.त्याने आपल्या कराची येथील घरी सर्वांसाठी खास जेवण तयार केले. यातील काही जण हे शाकाहारी हाेते. त्याच्यासाठी त्याने डाळ आणि भाजी तयार केली. सर्वांनी मनसाेक्तपणे येथील भाेजनाचा आनंद घेतला.

बातम्या आणखी आहेत...