आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा कसाेटी सामना साेमवारी ड्राॅ झाला. याचदरम्यान यजमान न्यूझीलंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेवर २ गड्यांनी मात केली. न्यूझीलंड संघाच्या याच विजयाने टीम इंडियाला थेट यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळाले. यातून भारत हा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची अंतिम फेरी गाठणारा एकमेव संघ ठरला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये २०२१-२३ च्या डब्ल्यूटीसीची फायनल हाेणार आहे. भारताने २०२१ मध्येही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली हाेती. यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे टीम इंडिया उपविजेता ठरली हाेती. आता कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे.
डब्ल्यूटीसी चार संघांची गुणतालिका
संघ विजय परा ड्रॉ विजय%
ऑस्ट्रेलिया 11 03 03 67%
भारत 10 05 03 59%
द. आफ्रिका 08 06 01 56%
श्रीलंका 05 05 01 48%
ड्रॉ कसाेटीच्या दाेनच डावांमध्ये १२२६ धावा, २२ बळींची नाेंद
अहमदाबादच्या नरेंद्र माेदी स्टेडियमवर यजमान टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची चाैथी व शेवटची कसाेटी झाली. आतापर्यंतच्या सलग तीनपेक्षा ही कसाेटी वेगळी आणि लक्षवेधी ठरली. पहिल्याच डावात उस्मान ख्वाजाने १० तासांपेक्षा अधिक काळ मैदानावर संयमी खेळी केली. यसह त्याला शतकी खेळी करता आली. यातूनच या कसाेटीच्या दाेनच डावांमध्ये जवळपास १२२६ धावांची नाेंद झाली. तसेच यादरम्यान २२ विकेट पडल्या. स्ट्रेलिया संघाने कालच्या बिनबाद ३ धावांवरून साेमवारी खेळण्यास सुरुवात केली. यादरम्यान उस्मान ख्वाजा (६) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर हेड आणि मार्नस लबुशेनने संघाचा डाव सावरला. या दाेघांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी करताना धावसंख्येला गती दिली. हेडने ९० धावांची खेळी केली. तसेच लबुशेनने नाबाद ६३ धावा काढल्या. यातून ८४ धावांची आघाडी घेत स्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव २ बाद १७५ धावांवर घाेषित केला. पाचव्या दिवशी निकालाची शक्यता कमी असल्याने दाेन्ही कर्णधारांच्या एकमताने ही कसाेटी ड्रॉ करण्यात आली. यजमान भारताने बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी मालिका २-१ ने नावे केली. विराट काेहली (१८६) सामनावीर व २५ बळी घेणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
सलग १६ वी मालिका, चाैथी बीजीटी भारतीय संघाच्या नावे नाेंद
यजमान भारताने सलग १६ व्या कसाेटी मालिका विजयाची नाेेंद नावे केली. भारताने सलग चाैथ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (बीजीटी) जिंकली आहे. भारताने मालिका २-१ ने आपल्या नावे केली. यापूर्वी भारतीय संघ २०१७, २०१९ आणि २०२१ मध्येही या ट्राॅफीचा मानकरी ठरला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.