आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20:हिलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया महिला संघाचा भारत दाैरा, किमला संधी

मेलबर्न11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ९ डिसेंबरपासून भारताविरुद्ध टी-२० मालिका; ऑस्ट्रेलिया महिला संघ जाहीर

येत्या ९ डिसेंबरपासून यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांतील टी-२० मालिकेला सुरुवात हाेणार आहे. या मालिकेसाठी अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघ भारत दाैरा करणार आहे. या दाैऱ्यावरील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी ऑस्ट्रेलिया संघाची घाेषणा करण्यात आली. यादरम्यान हिलीकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. तसेच ताहलिया मॅकग्राकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मेग लॅनिंगने ऑगस्टमध्ये अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. त्यामुळेच हिली संघाचे नेतृत्व करणार आहे.

ऑस्ट्रेलियन महिला संघात अॅशले गार्डनर, जेस जोनासेन, निकोला केरी, डार्सी ब्राउन आणि एलिस पेरी यांचाही समावेश आहे. तसेच किम गर्थ आणि फोबी लिचफील्ड या दोन युवा खेळाडूंना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. यातून त्यांना टी-२० मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. िकम गार्थला आपल्या घरातूनच क्रिकेटचे तंत्रशुद्ध असे प्रशिक्षण मिळाले आहे. तिचे वडिल आणि आई हे आयर्लंड टीमकडून खेळलेेले आहेत. त्यानंतर आता किम ही ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...