आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे प्रमुख राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कोच असणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने यापूर्वीच श्रीलंका दौऱ्यासाठी 20 सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले आहे. पण, संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नव्हती.
इंडियन एक्सप्रेसने BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या हवाल्याने सांगितले की, राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी संघाचा प्रशिक्षक असणार आहेत. द्रविड दुसऱ्यांदा सीनियर टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून जात आहेत. यापूर्वी, 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर द्रविड भारतीय टीमचे बॅटिंग कंसल्टेंट होते. याशिवाय, ते इंडिया अंडर-19 आणि इंडिया-A टीमचे कोच राहिलेले आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी वेगळी टीम
भारतचा प्रमुख संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला 18 ते 22 जूनदरम्यान साउथैम्प्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा फायनल खेळायचा आहे. त्यानंतर टीम इंग्लंडमध्येच थांबेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरोधात पाच टेस्ट सामन्यांची सीरीज खेळेल. तर, श्रीलंकेसोबत वनडे आणि टी-20 सीरीजसाठी BCCI ने वेगळी टीम पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेला संघ
फलंदाज: शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडेय, नीतीश राणा
विकेटकीपर: ईशान किशन, संजू सैमसन
ऑलराउंडर: हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम
बॉलर: युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
13 जुलैपासून सीरीज
भारतीय टीमला कोलंबोमध्ये 13 जुलै ते 18 जुलैदरम्यान तीन वनडे मॅचची सीरीज आणि 21 ते 25 जुलैदरम्यान तीन टी-20 मॅचची सीरीज खेळायची आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.