आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia 1st T20 LIVE Score | IND VS AUS T20 Cricket Score And Latest Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय:भारतीय संघाने सलग 8 वा टी-20 सामना जिंकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन पराभवानंतर पहिला विजय

कॅनबराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चहल आणि नटराजनने घेतल्या 3-3 विकेट

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या 3 टी-20 सीरीजचा पहिला सामना 11 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा टी-20 मध्ये सलग आठवा विजय आहे. भारताला मागच्या वेळेस 8 डिसेंबर 2019 ला वेस्टइंडीजने हरवले होते. तर, भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 पराभवानंतरचा पहिला विजय आहे. मागच्या वेळेस 27 फेब्रुवारी 2019 ला ऑस्ट्रेलियाने 7 विकेटने पराभूत केले होते.

भारताने दिले होते 162 धावांचे लक्ष्य

सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 गमावून 150 धावा केल्या. कर्णधार एरॉन फिंचने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर, भारतच्या युजवेंद्र चहल आणि टी नटराजनने 3-3 विकेट्स घेतल्या.

भारताकडून लोकेश राहुलने 40 बॉलवर 51 आणि रविंद्र जडेजाने 23 बॉलवर 44 रनांची नाबाद खेली केली. राहुलचे हे टी-20 इंटरनॅशनल करिअरमधील 12वे अर्धशतक झाले. ऑस्ट्रेलियासाठी मोइसेस हेनरिक्सने 3 आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. याशिवाय, अॅडम जम्पा आणि मिचेल स्वेप्सनला 1-1 विकेट मिळाल्या.

भारताची खराब सुरुवात, धवन आणि कोहली स्वस्तात आउट

भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. ओपनर शिखर धवन एक रन काढून मिचेल स्टार्कच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली 9 बॉलवर 9 रन काढून स्पिनर मिचेल स्वेप्सनच्या बॉलव झेलबाद झाला.

नटराजनचे डेब्यू

वनडेनंतर भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनने टी-20 मध्ये डेब्यू केले. फॉस्ट बॉलर जसप्रीत बुमराहने त्याला टीम इंडियाची कॅप दिली. या पहिल्या सामन्यात नटराजनने तीन विकेट घेतल्या.

नवीन जर्सी घालून ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला

टी-20 सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडून नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरले. ही जर्सी 1868 च्या ऑस्ट्रेलियन संघाला सन्मानित करण्यासाठी घातली आहे.

दोन्ही संघ

भारत: लोकेश राहुल (विकेटकीपर), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, संजू सैमसन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि टी नटराजन.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), डी'आर्की शॉर्ट, मैथ्यू वेड, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मोइसेस हेनरिक्स, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, एडम जम्पा आणि जोश हेजलवुड.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser