आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलिया vs भारत:ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या वनडेत 51 धावांनी विजय; परदेशात भारतचा सलग दुसऱ्या सीरिजमध्ये पराभव

सिडनी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी न्यूझीलँडने भारताचा 3-0 ने पराभव केला होता

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची वन-डे सीरीज होत आहे. यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या सामन्यातही भारताचा पराभव झाला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. सीरीजच्या पहिल्या वनडेमध्ये याच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय संघाचा 66 धावांनी पराभव झाला होता. सीरीजचा अखेरचा सामना 2 डिसेंबरला कॅनबरामध्ये होत आहे.

भारतीय संघाचा परदेशी जमिनीवर सलग दुसऱ्या सीरीजमध्ये पराभव झाला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलँडने भारताला 3-0 ने पराभूत केले होते.

390 धावांचा पाठलाग करताना भारताने काढले 338 रन

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 390 धावांचा डोंगर भारतासमोर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारतीय टीम 9 गमावून 338 धावा काढू शकले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 89 आणि लोकेश राहुलने 76 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिंसने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जोश हेजलवुड आणि अॅडम जम्पाला 2-2 विकेट मिळाल्या. तर, मोइसेस हेनरिक्स आणि ग्लेन मॅक्सवेलने 1-1 विकेट घेतली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser