आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारताच्या नजरा आता मिशन वनडे विश्वचषकाकडे असतील. शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत समोरासमोर येणार आहेत. पहिला सामना मुंबईत होणार आहे. तीन वर्षांनंतर भारतीय भूमीवर दोन्ही देशांमधली ही पहिली वनडे मालिका असेल. अन्य दोन सामने विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणार आहेत. जानेवारी २०२० मध्ये दोन्ही संघांनी भारतात शेवटचा वनडे खेळला होता.
त्याचबरोबर दोन्ही संघांमधील शेवटची वनडे मालिका नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात खेळली गेली, ज्यामध्ये भारताचा २-१ असा पराभव झाला होता. वानखेडे स्टेडियमवरील सामन्याने सुरू होणारी आगामी मालिका ही दोन्ही संघांसाठी वनडे विश्वचषकाची तयारी आहे. वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. सध्याच्या फ्यूचर टूर प्रोग्रामनुसार, भारताकडे ९ वनडे सामने आहेत आणि ऑस्ट्रेलियाकडे विश्वचषकापूर्वी ११ वनडे सामने शिल्लक आहेत.
दोन्ही संघांना यातील ६-६ सामने भारतातच खेळायचे आहेत. कारण या मालिकेनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. याशिवाय भारत वेस्ट इंडीजमध्ये ३ वनडे खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत ५ वनडे खेळेल. म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत संघांना प्रयोग करण्याची संधी मिळणार असून सप्टेंबरमध्ये संघ तयारीला अंतिम रूप देऊ शकतात.
पहिल्या वनडेतून रोहित बाहेर, हार्दिक पांड्या कर्णधार
मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कार्यक्रमाच्या व्यग्रतेमुळे उपलब्ध नाही. तो दुसऱ्या सामन्यात संघात परतेल. त्याच्या जागी अष्टपैलू हार्दिक पंड्या कर्णधार असेल. श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे १८ सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे.
नंबर-१ आणि नंबर-२ संघांमध्ये रंगत आहे संघर्ष
भारत सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया २ रेटिंग गुणांच्या अंतरासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला तर भारताचे नंबर-१ चे स्थान धोक्यात येईल. त्यांनी २०१९ मध्ये वनडे मालिकेत भारता हरवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.