आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia 4th Test Siraj, Washington Sundar Abused By Crowd, Called Grub

6 दिवसांत तिसर्‍यांदा गैरवर्तन:ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन दर्शकांनी सिराज आणि सुंदरला झुरळ म्हणून चिडवले, यापूर्वी म्हटले होते कुत्रा आणि माकड

ब्रिस्बेन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील रिपोर्ट

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेली चौथी कसोटी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी 2 भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन दर्शकांकडून गैरवर्तनाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार, भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदरला दर्शकांनी झुरळ (ग्रब) म्हणून चिडवले आहे.

मागील 6 दिवसात तिसऱ्यांना भारतीय खेळाडूंना अपशब्दांचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी, सिडनी टेस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन दर्शकांनी सिराजला माकड आणि कुत्रा म्हणून चिडवले होते. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरचा पहिला कसोटी सामना आहे. त्याला आपल्या पहिल्याच सामन्यात अपशब्दांचा सामना करावा लागला.

सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील रिपोर्ट

सिडनी मॉर्निंग हेराल्डने केट नावाच्या दर्शकाच्या हवाल्याने रिपोर्ट छापली आहे. केटने सांगितल्यानुसार, घटनेदरम्यान सिराज आणि सुंदर बॉउंड्री लाइनवर फील्डिंग करत होते. यावेळी त्यांच्या मागे बसलेल्या दर्शकांनी त्यांना झुरळ म्हणून चिडवले. केट म्हणाला, 'ही घटना सिडनीसारखीच होती. यांनी आधी गाणे म्हणने सुरू केले आणि सिराजला आपल्याकडे पाहायला सांगितले. सिराजने मागे वळून पाहिल्यानंतर त्याला चिडवण्यात आले.'

पत्रकार सॅम फिलिप्सने पोस्ट केला व्हिडिओ

सिडनी मॉर्निंग हेराल्डचे पत्रकार सॅम फिलिप्सने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले, 'गाबामध्ये दर्शकांनी तिसऱ्यांना सिराजला चिडवले.'

CA च्या आश्वासनानंतर घडली घटना

सिडनीमध्ये झालेल्या वादानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने भारतीय संघाची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, अशाप्रकारच्या घटना कदापी सहन केल्या जाणार नाहीत. आम्ही याविरोधात योग्य ती कारवाई करणार. त्यांच्या या आश्वासनानंतरही भारतीय खेळाडूंना अपशब्दांचा सामना करावा लागाल आहे.

बातम्या आणखी आहेत...