आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia Mohali T20 LIVE Score Updates; Rohit Sharma Virat Kohli Hardik Pandya Jasprit Bumrah | IND VS AUS Playing 11

ऑस्ट्रेलियाची भारतावर 4 गडी राखून मात:मैथ्यू वेडची धमाकेदार बॅटींग; हार्दिक, राहुल सुर्यकुमारची खेळी व्यर्थ

मोहाली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला हार पत्कारावी लागली. भारताने दिलेले 209 धावांचे तगडे आव्हान आस्ट्रेलिया संघाने 19 व्या षटकांत सहज पार करीत 4 गडी राखून भारताचा पराभव केला.

ऑस्ट्रेलियातर्फे कॅमरन ग्रीनने सर्वात जास्त 30 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यानंतर मैथ्यू वेडने धमाकेदार खेळ करीत 21 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला, पण तोपर्यंत संघाला विजयासाठी केवळ 2 धावांची गरज होती. त्यानंतर अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आस्ट्रेलियाने विजय संपादन केला.

भारताच्या भुवनेश्वर कुमार आणी उमेश यादव यांनी आस्ट्रेलियाच्या 11 ते 14 व्या षटकापर्यंत फलंदाजांवर वर्चस्व मिळवले पण त्यानंतर वेडने आपली पूर्ण क्षमता सिद्ध करीत सामना आपल्या बाजूने झुकवला. भारतीय संघाने या सामन्यात तीन महत्वाचे झेल सोडले, त्याचा फटकाही बसला.

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (55 धावा), हार्दिक पांड्या (71) आणि सूर्यकुमार यादव (46) यांनी 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‌ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात भारतीय संघाने 208/6 धावा केल्या आणि आस्ट्रेलियाला 209 धावांचे विजयासाठी आव्हान दिले. कप्तान रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ विराट कोहलीही बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 32 चेंडूत 50 धावा काढीत अर्धशतक साजरे केले. त्यानंतर तो बाद झाला. पाठोपाठ सुर्यकुमार यादवही अवघ्या 25 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. हुकमी एक्का हार्दिक पंड्याने ऑस्टेलियन गोलंदाजाची धुलाई केली त्याने 30 चेंडूत 71 धावा केल्या.

या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करीत असून भारताकडून जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत आजचा सामना खेळणार नाहीत. उमेश यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये असून दिनेश कार्तिकलाही संघात संधी मिळाली.

T20, क्रिकेटचा सर्वात लहान फॉरमॅट, 2007 मध्ये पहिल्यांदा भारतात दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. या मालिकेत एकच सामना झाला आणि भारताने सामना जिंकला.

15 वर्षात पहिल्यांदाच दोन्ही संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. शेवटच्या वेळी दोन्ही संघ 2019 मध्ये टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय भूमीवर उतरले होते. या मालिकेत टीम इंडियाचा 0-2 असा पराभव झाला. म्हणजेच यावेळी टीम इंडियाला तीन वर्षांचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे.

खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड, आजच्या सामन्यातील संभाव्य प्लेइंग इलेव्हनसह सर्व मोठे रेकॉर्ड्स बद्दल आपण जाणून घेऊयात..

सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा टॉप परफॉर्मर जाणून घ्या...

भारतात ऑस्ट्रेलियाला हरवणे कठीण

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकूण विक्रम चांगला आहे, पण जेव्हा भारतीय भूमीवरील स्पर्धेचा विचार केला जातो, तेव्हा हे प्रकरण थोडे आव्हानात्मक होते. भारतात, दोन्ही संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 4 तर ऑस्ट्रेलियाने 3 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

खेळपट्टी कशी असेल?

मोहालीत दव हा एक मोठा घटक ठरू शकतो. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल. दव असल्यामुळे चेंडू घसरून गोलंदाजांना कमी मदत मिळेल. याचा थेट फायदा फलंदाजांना होईल.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर लक्ष्याचा पाठलाग करताना 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना आणि 4 लक्ष्यांचा पाठलाग करताना 5 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.

येथे पाहा थेट प्रक्षेपण?

पहिल्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. दुसरीकडे, जर तुम्हाला मोबाईलवर सामना पाहायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठी अॅपवर क्षणोक्षणी सामन्याची माहिती वाचू शकता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घेण्यापूर्वी, भारतात आतापर्यंत खेळलेल्या मालिकेविषयी जाणून घेऊयात...

टीम इंडिया आजच्या सामन्यात दोन मोठे बदल करू शकते. आशिया चषक स्पर्धेत दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. त्याचवेळी आजच्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत हे दोघेही खेळताना दिसतील.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत - केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल.

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), जोश इंग्लिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅडम झाम्पा, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड.

बातम्या आणखी आहेत...