आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्याची माेहीम फत्ते केल्यानंतर आता यजमान टीम इंडिया घरच्या मैदानावरील वर्ल्डकप मिशनसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया सर्वात आव्हानात्मक ठरलेल्या वानखेडे स्टेडियमवरून आपल्या मिशन वर्ल्डकपला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आज शुक्रवारी सलामीच्या वनडे सामन्यात समाेरासमाेर असणार आहेत. येथील सलामीच्या लढतीने या दाेन्ही संघांतील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. भारताने नुकतीच घरच्या मैदानावर आयाेजित पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्धची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिका २-१ ने आपल्या नावे केली. यासह भारताने डब्ल्यूटीसी फायनलही गाठली आहे. भारतीय संघ आता विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात पडलेल्या मैदानावरून पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनची माेहीम फत्ते करणार आहे. भारतीय संघाने वानखेडेवर आतापर्यंत विजयासाठी माेठी कसरत केल्याची नाेंद आहे. यातून संघाच्या नावे या मैदानावर १९ सामन्यांमध्ये १० विजयाची नाेंद करता आली. यातून भारतासाठी हे मैदान आतापर्यंत संमिश्र यश देणारेच ठरलेे.
वानखेडे स्टेडियम पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघासाठी लकी
बीजीटी मालिका पराभवातून सावरलेला ऑस्ट्रेलिया संघ आता वनडे वर्ल्डकपच्या तयारीला लागला आहे. या संघाला यंदा ऑक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान भारतात हाेणाऱ्या वनडे वर्ल्डकप मिशनला चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी मुंबईतील वानखेडे मैदानावर लकी ठरले आहे. या संघाने २०२० मध्ये याच मैदानावर टीम इंडियावर १० गड्यांनी मात केली हाेती. हाच माेठा विजय साजरा करणारे तत्कालीन संघातील सात खेळाडू आताही सहभागी आहेत. त्यामुळे आता याच कामगिरीला उजाळा देण्याचा पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचा मानस आहे.
२ वेळा ३००+ स्काेअर; सर्वाेच्च धावसंख्या भारताची
वानखेडे स्टेडियमवर ४४ पैकी फक्त दाेन सामन्यांत ३००+ धावसंख्येची नाेंद झाली आहे. त्यामुळे हे मैदान फलंदाजांसाठी आव्हानात्मक मानले जाते. असे असतानाही यजमान भारताने २०१५ मध्ये पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ बाद ४३८ धावा काढल्या हाेत्या. अद्यापही हा विक्रम टीम इंडियाच्या नावे कायम आहे.
संघ निवड निर्णायक; दाेन्ही संघांचे नवे नेतृत्व
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेकीचा काैल हा संमिश्र यश देणारा आतापर्यंत ठरला आहे. यातून दाेन्ही संघांच्या नव्या नेतृत्वाची निवडच निर्णायक ठरणार आहे. हार्दिककडे यजमान टीमचे व स्मिथकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वातील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची वाट खडतर; आतापर्यंत तीन शतकवीर
यजमान टीम इंडियासाठी वानखेडे स्टेडियमवरून मिशन वर्ल्डकपला दमदार सुरुवात करण्याची वाट अधिक खडतर मानली जात आहे. या मैदानावर आतापर्यत भारताला १५ पैकी फक्त ७ वनडे सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारताचे फक्त तीनच फलदंाज शतकवीरचे मानकरी ठरलेले आहेत. यामध्ये विराट काेहलीसह (२०१७) मास्टर ब्लास्टर सचिन (१९९६) आणि माे. अझरुद्दीनचा (१९८७) समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.