आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia | Rahit's Biggest 'Kasati', Rahit Will Play Kasati Match After March 2022

भारत vs ऑस्ट्रेलिया:राेहितची सर्वात माेठी ‘कसाेटी’, मार्च 2022 नंतर राेहित खेळणार कसाेटी सामना

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरच्या मैदानावर राेहितसमाेर नंबर वन ऑस्ट्रेलियाचे आव्हान
  • राेहितची भारताकडून १० पैकी ८ कसाेटी सामन्यांतून माघार
  • नेतृत्वात राेहितची गैर आशियाई संघाविरुद्ध पहिलीच कसाेटी

येत्या गुरुवारपासून ऑरेंज सिटी नागपूरच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. सलामीची कसाेटी व्हीसीए स्टेडियमवर रंगणार आहे. यादरम्यान यजमान टीम इंडियाच्या कर्णधार राेहित शर्माची घरच्या मैदानावर सर्वात माेठी कसाेटी आहे. कारण, ताे ११ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कसाेटी सामना खेळणार आहे. त्याने मार्च २०२२ मध्ये शेवटची कसाेटी खेळली हाेती. त्याने भारताकडून १० पैकी आठ कसाेटी सामन्यांतून माघार घेतली हाेती. त्यामुळे आता त्याला घरच्या मैदानावर नंबर वन ऑस्ट्रेलिया कसाेटी संघाच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे यजमान टीम इंडियाविरुद्ध कसाेटी मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलिया संघाने कंबर कसली आहे. यासाठी फलंदाज कसून सराव करत आहेत.

राेहितला २ कसाेटीतील नेतृत्वाचा अनुभव; संघ निवडीचा माेठा पेच! कर्णधार राेहित शर्मा हा ११ महिन्यांनंतर पहिल्यांदाच कसाेटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याची या मालिकेदरम्यान माेठी कसाेटी लागणार आहे. त्याला कसाेटीमध्ये कर्णधाराच्या भूमिकेतही माेठा अनुभव नाही. याच अनुभवाच्या अभावाचा त्याला फटका बसू शकताे. यातून संघाच्या विजयाची मदार ही फिरकीपटूंवर असेल. भारताला आता या चार कसाेटी मालिकेमध्ये ३ विजयाची गरज आहे. यातून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठता येणार आहे. यासाठी टीम इंडियाला घरच्या मैदानावर दर्जेदार कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे २००४ पासूनची भारत दाैऱ्यावरील कसाेटीमधील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे. यादरम्यान राेहितचा नेतृत्वाचा अनुभव कमी पडणार आहे. त्याने फक्त दाेनच कसाेटी सामन्यात टीम इंडियाकडून कर्णधाराची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता त्याच्यासमाेर संघ निवडीचाही माेठा पेच आहे. त्यामुळे यादरम्यान त्याला निर्णय घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

काेच द्रविडचा स्लिप फील्डिंगवर भर; संडेला सरावाला दांडीमालिका विजयासाठी सध्या यजमान टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खास डावपेच आखत आहे. त्याने दर्जेदार गाेलंदाजी आणि फलंदाजीपाठाेपाठच क्षेत्ररक्षणावरही अधिक भर देत आहे. यासाठी त्याने खेळाडूंना स्लिप फील्डिंगसाठी खास टिप्स दिल्या आहेत. त्याने खेळाडूंना स्लिप फील्डिंग व क्लाेज कॅचिंगचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शन केले. रविवार असल्याने यजमान टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावाला दांडी मारली.

बातम्या आणखी आहेत...