आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतासोबत वर्षाच्या शेवटीला होणाऱ्या टेस्ट सीरीजचा शेड्यूल जाहीर केला आहे. परंतू, याची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली जाऊ शकते. क्रिकेट.कॉम.एयूच्या रिपोर्टनुसार, पहिला मॅच 3 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. यानंतर भारतीय टीम परदेशातील आपला पहिला डे-नाइट टेस्ट खेळेल, जो 11 डिसेंबरला एडिलेडमध्ये खेळवला जाईल.
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 4 टेस्ट आणि 3 वनडेची सीरीज खेळायची आहे. कोरोनामुळे भारतीय संघाला दौऱ्यावर गेल्यानंतर स्वतःला 14 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागेल, यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली आहे. परंतू, या दौऱ्यातील वन-डे सीरिजबाबत कोणत्ची माहिती देण्यात आली नाही.
26 दिसेंबरला होईल बॉक्सिंग डे टेस्ट
दोन्ही देशांमध्ये 26 डिसेंबरला मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे खेळवला जाईल. यानंतर 3 जानेवारीला सिडनीमध्ये न्यू ईयर टेस्ट खेळवला जाईल. क्रिसमसच्या दुसऱ्या दिवसी म्हमजेच 26 डिसेंबरला होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हटले जाते. तर, वर्षातील पहिला सामन्याला न्यू ईयर टेस्ट म्हटले जाते.
4 टेस्टच्या सीरीजचा शेड्यूल
तारीख | ठिकाण |
3-7 डिसेंबर | ब्रिस्बेन |
11-15 डिसेंबर | एडिलेड |
26-30 डिसेंबर | मेलबर्न |
3-7 जानेवारी | सिडनी |
परिस्थितीवर अवलंबून असेल टेस्ट सीरीज
रिपोर्टनुसार, सीएने सांगितले की, टेस्ट सीरीजसाठी शेड्यूल ठरवणे गरजेचे होते. परंतू, ही सीरिज होईल का नाही, हे ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.