आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia Test Series Update; Rohit Sharma Washington Sundar | Sai Kishore | Sport News

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी BCCIचा मोठा निर्णय:हे 4 स्पिनर्स टीम इंडियात होणार सामील; सीरीजसाठी भारताची कसून तयारी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारताने सरावासाठी एकूण 8 स्पिनर्सची फौज तयार केली. बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सराव सुरू केला. दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला. संघात नवीन चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया टीम स्पिनर्सला टक्कर देण्याच्या तयारीत

सुत्रांनी काही माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर यांना टीम इंडियात जोडले आहे. या सर्वांना नेट गोलंदाज म्हणून संघात ठेवण्यात आले. हे चौघेही संपूर्ण मालिकेसाठी टीम इंडियासोबत राहतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी मालिका होणार आहे. ज्यामध्ये स्पिनर्सचे खूप मोठे राहणार आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाने भारतीय स्पिनर्सना टक्कर देण्याची तयारी सुरू केली. तर दुसरीकडे टीम इंडियानेही त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली.

8 स्पिनर्ससोबत टीम इंडियाला सराव करता येणार
जे खेळाडू निव्वळ केवळ स्पिनर्स म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. ते सर्व फिरकीपटू आहेत. तर भारताकडे जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव असे 4 वेगवान गोलंदाज आहेत. जे सराव आणि सामन्यात उपयुक्त ठरू शकतात. फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर, संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही समावेश आहे. म्हणजेच सरावादरम्यान भारताकडे एकूण 8 फिरकीपटू असतील, अशा स्थितीत फलंदाजांना सरावासाठी चांगला फायदा आहे.

कांगारूविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटीसाठी इंडिया टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घ्या जाणून
पॅट कमिन्स (क), अ‌ॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा- कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी सामना - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
  • दुसरी कसोटी सामना - 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
  • तिसरी कसोटी सामना - 1 ते 5 मार्च, धर्मशाला
  • चौथी कसोटी सामना - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

हे ही वाचा..

ऑस्ट्रेलियाचा गेम प्लॅन:डुप्लिकेट ‘अश्विन’च्या गोलंदाजीवर स्मिथ, लबुशेन, हेडचा सराव! 21 वर्षीय महीशला ऑस्ट्रेलियाची खास पसंती

याच मालिकेच्या तयारीसाठी सध्या ऑस्ट्रेलियन फलंदाज अश्विनचा डुप्लिकेट मानल्या जाणाऱ्या २१ वर्षीय युवा गोलंदाज महीश पिठियाच्या चेंडूंवर कसून सराव करत आहे. या युवा गोलंदाजाची चेंडू टाकण्याची शैली पूर्णपणे अश्विनसारखीच आहे. त्यामुळे त्याला डुप्लिकेटस अश्विन मानले जाते. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...