आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा 30 दिवसानंतर फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. शुक्रवारी नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (NCA) च्या फिजियोने रोहितला फिट असल्याचे घोषित केले. हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित IPL 2020 दरम्यान हॅम-स्ट्रिंग म्हणजेच, मांस पेशीतील दुखापतीने त्रस्त होता. दरम्यान, फिट झाल्यावरही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटीमध्ये रोहितला स्थान मिळेल का नाही, याची अद्याप माहिती नाही. या दोऱ्यावर भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी सामने होतील. यापूर्वी टी-20 आणि वनडे सीरीज संपली आहे.
वृत्त संस्थांनी सांगितल्यानुसार- रोहित इंटरनेशनल क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. आता BCCI आणि सिलेक्शन कमेटी हा निर्णय घेईल की, रोहितला संघात कधी सामील करायचे. रोहित 14 डिसेंबरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल.
IPL दरम्यान रोहितला दुखापत झाली
UAE मध्ये झालेल्या IPL च्या 13 व्या सीजनमध्ये मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित हॅम-स्ट्रिंगमुळे चार सामने खेळला नव्हता. यानंतर BCCI ने रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 स्कवॉडमध्ये सामील केले नव्हते. परंतू, नंतर कसोटीमध्ये जागा दिली होती.
पहिले 2 कोसीट खेळणे अवघड
जर रोहित पुढील 2 दिवसात ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला, तर त्याला तिथे 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यामुळे 26 डिसेंबरपर्यंत रोहितला ट्रेनिंगला मुकावे लागणार. म्हणजेच, सुरुवातीच्या कसोटीला रोहितला खेळता येणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.