आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या गुरुवारपासून भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान सलामीची कसाेटी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. याच मालिकेसाठी सध्या दाेन्ही संघ कसून सराव करत आहेत. या मालिकेदरम्यान फिरकीपटूंची भुमिका ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे फिरकीचे वारेच मालिकेच्या विजयाची दिशा निश्चित करताना दिसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, गत दहा वर्षांमध्ये भारतीय मैदानावर फिरकीच्या गाेलंदाजांना आपले वर्चस्व गाजवता आले. त्यांनी आपल्या सर्वाेत्तम गाेलंदाजीतून प्रतिस्पर्धी संघांच्या अव्वल फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. त्यामुळे फिरकीपटूंनी सर्वाधिक ६५ टक्के विकेट भारताच्या मैदानावर घेतल्या आहेत. यादरम्यान वेगवान गाेलंदाज भारतातील खेळपट्टीवर सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नावे फक्त ३४ टक्के बळींची नाेंद आहे. फिरकीपटूंच्या कामगिरीचा उंचावलेला आलेख पाहूनच सध्या आॅस्ट्रेलिया संघाने माेठा धसका घेतला आहे.
फिरकीपटूंचे डावामध्ये ४८ वेळा ५+ बळी भारतामध्ये सर्वाधिक ४८ वेळा फिरकीपटूंनी डावात ५ पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. यातवेगवान गाेलंदाज पिछाडीवर आहेत. वेगवान गाेलंदाजांना १४ वेळाच हे यश संपादन करता आले. गत २०१३ पासून ६५ टक्के बळी हे फिरकीपटूंनी भारतातील मैदानावर घेतले आहेत. त्यामुळेच कमी धावांत झटपट बळी घेण्यात याठिकाणी फिरकीपटू अधिक तरबेज ठरलेले आहेत.
१ जानेवारी २०१३ पासून भारतातील गाेलंदाजी एकूण बळी फिरकी वेगवान गाे. 1372 893 479
{फिरकीपटंूनी ११ वेळा डावात सर्वच १० बळी घेतल्याची कामगिरी केली. वेगवान गाेलंदाज यांच्या नावे फक्त एकदाच नाेंद {२०२१ मध्ये वानखेडेवर न्यूझीलंडच्या एकट्या एजाजने यजमान भारताचा डावात धुव्वा उडवला. त्याने १० बळी घेतले.
अश्विन-जडेजाच्या गत १० वर्षांत ४००+ विकेट आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा घरच्या मैदानावर गत दशकापासून आपले निर्विवाद वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळेच भारताची ही जाेडी दाैऱ्यावर आलेल्या प्रत्येक विदेशी संघासाठी किलर ठरली आहे. या दाेघांनी आपला दबदबा कायम ठेवताना गत दहा वर्षांत ४०० पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. यात अश्विनच्या नावे २५८ आणि जडेजाच्या नावे १६९ विकेटची नाेंद आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत हे दाेघेच टाॅप-२ मध्ये आहेत. त्यानंतर वेगवान गाेलंदाज उमेश यादवला तिसरे स्थान गाठता आले. त्याच्या नावे फक्त ८० विकेटची नाेंद आहे.
भारतात सामना जिंकणेच अधिक जिकिरीचे : स्मिथ आॅस्ट्रेलिया संघासाठी भारतात मालिका साेडाच, या सिरीजमध्ये सामना जिंकणेही अधिक जिकिरीचे असल्याची प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियन माजी कर्णधार स्मिथने दिली.
या दाैऱ्यावर यजमानांविरुद्ध विजय संपादन करणे आव्हानात्मक आहे. -मिचेल स्टार्क, वेगवान गाेलंदाज
हा दाैरा करिअरला नवी दिशा देणारा ठरला आहे. ही मालिका अॅशेसपेक्षाही कठीण आहे. पॅट कमिन्स, कर्णधार
भारतात विजय संपादन करणे कठीण आहे. फिरकीत मी चांगली कामगिरी करेल. नॅथन लियाेन, स्पिनर अॅशेसपेक्षाही अधिक आव्हानात्मक अशी ही भारतात हाेणारी मालिका वाटत आहे. डेव्हिड वॉर्नर, फलंदाज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.